'डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती ठीक आहे हे दिलासादायक…' वॉशिंग्टन हॉटेलमधील गोळीबारानंतर पंतप्रधान मोदींची पहिलीच प्रतिक्रिया ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Washington Hilton shooting April 2026 : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये शनिवारी रात्री एक असा थरार घडला ज्याने जगाचा काळजाचा ठोका चुकवला. प्रगत सुरक्षेचे दावे केले जाणाऱ्या अमेरिकेत, खुद्द राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत गोळीबार होणे ही साधी गोष्ट नाही. ‘व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर’ या अत्यंत प्रतिष्ठित कार्यक्रमात जेव्हा डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump), फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स उपस्थित होते, तेव्हाच गोळीबाराच्या आवाजाने हॉटेलचा परिसर हादरून गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रम ऐन रंगात असताना अचानक गोळ्यांचे आवाज ऐकू आले. युएस सिक्रेट सर्व्हिसने क्षणार्धात पाहुण्यांना टेबलांखाली वाकण्याची सूचना दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुरक्षा रक्षक मानवी साखळी करून मंचावरून सुरक्षित स्थळी घेऊन गेले. हिल्टन हॉटेलच्या बॉलरूममध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. सुदैवाने, सुरक्षा दलांनी चपळाई दाखवत गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला घटनास्थळीच बेड्या ठोकल्या. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हॉटेलच्या लॉबी आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अपुरी होती, ज्याचा फायदा हल्लेखोराने घेतला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Safe : ‘मृत्यू समोर होता, पण सिक्रेट सर्व्हिसने वाचवलं!’ WCDच्या बडतर्फीवर ट्रम्प यांची पहिलीच प्रतिक्रिया; पाहा VIDEO
या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आपली प्रतिक्रिया दिली. मोदी म्हणाले, “वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मी काळजीत होतो, मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स सुखरूप असल्याचे कळल्याने मला मोठा दिलासा मिळाला आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट शब्दांत सुनावले की, “लोकशाहीच्या रचनेत कोणत्याही प्रकारच्या हिंसेला थारा दिला जाऊ शकत नाही. अशा कृत्यांचा आपण सर्वांनी एकमताने निषेध केला पाहिजे.” मोदींनी या सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थनाही केली.
Relieved to learn that President Trump, the First Lady and Vice President are safe and unharmed following the recent security incident at a Washington DC hotel. I extend my best wishes for their continued safety and well-being. Violence has no place in a democracy and must be… — Narendra Modi (@narendramodi) April 26, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO : ‘आज रात्री गोळीबार होणार आहे’ घटना घडण्यापूर्वीच ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरीने कसे केले होते याचे ‘भाकीत’?
राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सिक्रेट सर्व्हिससाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. बॉलरूम आणि व्हीआयपी झोनमध्ये कडेकोट बंदोबस्त असताना, हॉटेलच्या इतर भागात सुरक्षा का कमकुवत होती? हा प्रश्न आता विचारला जात आहे. या हल्ल्याचा उद्देश काय होता आणि हल्लेखोराचे कोणाशी संबंध आहेत, याचा तपास सध्या एफबीआय (FBI) करत आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील आगामी राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता असून, जागतिक नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
Ans: शनिवारी रात्री आयोजित 'व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर' दरम्यान हा गोळीबार झाला.
Ans: होय, डोनाल्ड ट्रम्प, मेलानिया ट्रम्प आणि जेडी व्हान्स यांना सुरक्षा रक्षकांनी सुरक्षितपणे बाहेर काढले असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.
Ans: पंतप्रधान मोदींनी या घटनेचा निषेध केला असून लोकशाहीत हिंसेला स्थान नसल्याचे सांगत ट्रम्प यांच्या सुरक्षेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.






