फोटो सौजन्य- pinterest
हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक गुरुवार देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी खास शुभ मानला जातो. विशेषतः तिसरा गुरुवार अधिक फायदेशीर मानला जातो. कारण या दिवशी केलेली पूजा, व्रत आणि मंत्रजपामुळे धनलाभ, सुख-समृद्धी आणि घरातील कलह दूर होण्याचे संकेत दिले आहेत.
मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार 11 डिसेंबर रोजी आहे. या दिवशी सूर्योदय साधारण सकाळी 6.45 ते 7.10 पर्यंत असणार आहे. तर पूजेसाठी शुभ मुहूर्त सूर्योदयापूर्वी 5 ते 6 अभिजीत मुहूर्त दुपारी 11.45 ते 12.30 सायंकाळी लक्ष्मी पूजन 6.30 ते 8 या वेळेत करता येईल. यावेळी पूर्वाफाल्गुनी नक्षत्र असणार आहे. तर अमृत काळ 09:44 ते 11:06 असेल. राहू काळची वेळ दुपारी 1.51 ते 3.14 असेल. मार्गशीर्षातील गुरुवार संपूर्ण दिवस पूजेसाठी शुभ मानला जातो.
गुरुवारी पूजेची सुरुवात करण्याआधी ज्या ठिकाणी पूजा करणार आहात ते ठिकाण स्वच्छ करुन घ्या. त्या ठिकाणी केशर-पाणी किंवा गंगाजल शिंपडून स्वच्छ करुन घ्या. कलशाची स्थापना करण्याच्या वेळी तांबे किंवा पितळेचा कलश स्वच्छ करून घ्या.कलशात पाणी, सुपारी, तांदूळ, पंचपल्लव आणि नाणे टाका. त्यावर नारळ व लाल कपडा बांधून ठेवा. त्यानंतर पूजेची सुरुवात करताना देवी लक्ष्मी व भगवान विष्णूची प्रतिमा किंवा फोटो स्वच्छ करून स्थापना करा. त्या फोटो किंवा प्रतिमेला हळदीकुंकू, तांदूळ, फुले अर्पण करा. देवीलाकमळ किंवा पिवळी फुले विशेष प्रिय मानली जातात. पूजा झाल्यानंतर केशरयुक्त दूध, पूरणपोळी, चिरा-गूळ किंवा गाईचे तूप यांचा नैवेद्य दाखवावा. गुरुवार असल्याने मीठरहित प्रसादही विशेषमान्य आहे. ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः आणि ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करावा. असे करणे फायदेशीर ठरते.
मार्गशीर्षच्या तिसऱ्या गुरुवारी पितळेच्या दिव्यात तूप लावून दीप प्रज्वलित करा. घराच्या मुख्य दरवाजाजवळ दीप लावल्यास आर्थिक स्थिती चांगली राहते, असे मानले जाते. पिवळे वस्त्र, चणे-गूळ, हलवा किंवा तूप दान करणे विशेष शुभ मानले जाते. गुरुवारी हे दान केल्यास बृहस्पति ग्रह मजबूत होतो, अशी श्रद्धा देखील आहे.
मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी केलेल्या पूजेमुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो, असे मानले जाते. व्रत व उपासनेने अडथळे दूर होतात आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा होताना दिसून येते. तसेच गुरू ग्रह प्रसन्न झाल्याने विद्या, बुद्धी, करिअर आणि कौटुंबिक सौख्य वाढते. मार्गशीर्षातील गुरुवार देवांना अत्यंत प्रिय असल्याने संपूर्ण महिनाभर सतत शुभ फलप्राप्ती होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार हे धन, सुख-समृद्धी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानले जातात. तिसरा गुरुवार विशेषतः देवी लक्ष्मी व बृहस्पति ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी उत्तम मानला जातो.
Ans: तिसऱ्या गुरुवारी महालक्ष्मी, श्री विष्णू आणि बृहस्पति देवाची पूजा करणे शुभ असते. काही ठिकाणी गुरुवार व्रतही पाळले जाते.
Ans: कलश हे 'पूर्णत्व आणि समृद्धी'चे प्रतीक मानले जाते. मार्गशीर्षात कलश ठेवणे म्हणजे घरात चैतन्य, शांतता, धनप्राप्तीचे स्वागत करणे.






