फोटो सौजन्य- pinterest
रविवार, 6 जुलै रोजी केतू पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात अक्षरशः प्रवेश करेल त्याचा हा प्रवेश 20 जुलै रोजी पूर्ण होईल. या संक्रमणाचा काही राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहेत. कोणत्या राशी आहेत त्या जाणून घ्या
केतू रविवार, 6 जुलै रोजी दुपारी 1.32 वाजता पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात अक्षरशः प्रवेश करेल त्याचा हा प्रवेश 20 जुलै रोजी दुपारी 2.10 वाजता पूर्ण होईल. केतूला एक छाया ग्रह मानला जातो. या ग्रह नेहमी वक्री गतीने फिरतो. या सर्व घटनेचा 12 राशीच्या लोकांवर वेगवेगळ्यारित्या प्रभाव पडतो. तर काही राशीच्या लोकांवर याचा सकारात्मक परिणाम होतो.
जुलै महिन्यामध्ये केतूच्या नक्षत्रातील हा बदल काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळू शकते. काही ठिकाणाहून या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. कोणत्या राशी आहेत त्या जाणून घ्या.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात केतुच्या संक्रमणाचा फायदा वृषभ राशीच्या लोकांसाठी होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. जुने अडकलेले सर्व कामे पूर्ण होतील. जे लोक स्पर्धा परीक्षा किंवा एखाद्या मुलाखतीची तयारी करत असतील तर त्यांना यश मिळेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. कठोर मेहनत घेणाऱ्यांना आर्थिक लाभ होतील. तसेच व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना फायदा होईल.कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारेल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
तूळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर राहील. या लोकांची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. जुनी अडकलेली कामे पूर्ण होतील. नवीन योजना आखत असल्यास त्यात तुम्हाला फायदा होईल. वैयक्तिक जीवनात गोडवा राहील. नातेसंबंधात असलेले मतभेद दूर होतील. जर तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला आहे.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण चांगले राहील. तुमचा आत्मनिरीक्षण आणि आध्यात्मिक विकास होईल. कला, लेखन, संगीत किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित लोकांना या काळात विशेष ओळख आणि आदर मिळू शकेल. कोणाही निर्णय घेताना विचारपुर्वक घ्यावा. आर्थिकदृष्ट्या हा दिवस चांगला आहे. नवीन गोष्टी खरेदी करु शकतात. तुम्हाला तुमच्या सर्जनशीलतेचा आणि नेतृत्व क्षमतेचा फायदा होऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)