फोटो सौजन्य- pinterest
आज शनिवार 28 जूनचा दिवस अधिपती ग्रह सूर्य आहे. सूर्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर असलेला दिसून येईल. मूलांक 1 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच काही मूलांक 8 असणाऱ्या लोकांना अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला राहील. या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता. आज तुम्हाला अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे टाळावे. तसेच काही लोकांना पैशांची कमतरता भासू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा दिवस सामान्य राहील. तुमच्यामधील भावनिकता वाढू शकते. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होतील. व्यवसायामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकता. या लोकांना व्यवसायामध्ये आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल.
आज मूलांक 4 असणाऱ्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावे. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी नवीन योजना आखू शकता त्याचा तुम्हाला फायदा होईल.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. आज काही समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी. जर नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असल्यास आजचा दिवस चांगला आहे.
आज मूलांक 7 असलेल्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. तसेच आर्थिक समस्या देखील जाणवू शकते. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी.
मूलांक 8 असलेल्या लोकांना काही अडचणींना सामोरे जावे लागेल. या लोकांचे आज मन अस्वस्थ राहू शकते. तुमच्यावरचा मानसिक ताण कमी होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वादविवाद करु नका.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांना रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. नवीन मालमत्ता खरेदी करु शकता. कोणतेही निर्णय घेताना घाई करु नका अन्यथा नुकसान होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)