फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Usman Khawaja’s incredible innings : २०२५-२०२६ च्या अॅशेस मालिकेच्या समाप्तीसह, उस्मान ख्वाजाची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही संपली आहे. सिडनीमधील पाचव्या कसोटीपूर्वी, ख्वाजाने तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाच्या दणदणीत विजयासह, ख्वाजाने आपली शानदार कारकीर्द संपवली आणि निवृत्ती घेतली. आता, निवृत्तीनंतर अवघ्या दोन दिवसांत, उस्मान ख्वाजाने मैदानात पुनरागमन केले आणि बीबीएलमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.
३९ वर्षीय उस्मान ख्वाजा गेल्या काही काळापासून दुखापतींनी त्रस्त होता. सर्वांना माहित होते की तो त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्याने सिडनीमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला आणि निवृत्ती घेतली. त्याच्या शेवटच्या कसोटी मालिकेत त्याने चार सामन्यांमध्ये १७६ धावा केल्या, ज्यामध्ये अॅडलेडमधील शानदार ८२ धावांचा समावेश होता.
निवृत्तीनंतर उस्मान ख्वाजाने बीबीएल २०२५-२६ हंगामात भाग घेतला. ब्रिस्बेन हीटकडून खेळताना त्याने सिडनी थंडरविरुद्ध त्याच्या स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन केले. सिडनी थंडरने १८१ धावांचे लक्ष्य ठेवले आणि उस्मान ब्रिस्बेन हीटकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आला. त्याने सावध सुरुवात केली पण नंतर मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. उस्मानने ४८ चेंडूत ७८ धावांची शानदार खेळी केली, त्यात ७ चौकार आणि ३ शक्तिशाली षटकार मारले.
Two days after his Test retirement at one home ground, Usman Khawaja was back at another to guide Heat to a fine victory over Thunder #BBL15 Report: https://t.co/6A57j4lbsM pic.twitter.com/5gnsY6jE1H — cricket.com.au (@cricketcomau) January 10, 2026
उस्मान ख्वाजा व्यतिरिक्त, जॅक वाइल्डरमुथ आणि मॅट रेनशॉ यांनीही ब्रिस्बेन हीटसाठी चांगली खेळी केली. सुरुवातीला जॅकने जलद फलंदाजी केली आणि आवश्यक धावगती नियंत्रणात ठेवली. तो १५ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला. रेनशॉनेही मैदानावर येताच स्फोटक फटके मारण्यास सुरुवात केली. त्याने २६ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. ख्वाजाला या दोघांची साथ मिळाली आणि परिणामी, तो २२ चेंडू आणि ७ विकेट्स शिल्लक असताना ब्रिस्बेनला विजय मिळवून देऊ शकला.






