फोटो सौजन्य- pinterest
देवाचा सहावा अवतार म्हणजे नृसिंह अवतार. भगवाताला या पृथ्वीवर दहा अवतार घेऊन मानवाचे रक्षण करावे लागले. कारण भगवंताने गीतेत सांगितले हे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत यातील सहावा अवतार म्हणजे नृसिंह! नृसिंह हे सामर्थ्य आणि पराक्रमाचा देवता आहेत. अधर्म आणि अत्याचार करणाऱ्यांना भगवान नृसिंह कठोर शिक्षा देतात.
विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांनी अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी अनेक अवतार घेतले. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णूच्या (Narasimha Jayanti) 12 अवतारांपैकी नरसिंह हा सहावा अवतार आहे. भगवान नृसिंह हे सामर्थ्य आणि पराक्रमाचे देवता आहेत. अधर्म आणि अत्याचार करणाऱ्यांना भगवान नरसिंह कठोर शिक्षा देतात. धर्मग्रंथानुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला, आपल्या भक्त प्रल्हादच्या रक्षणासाठी, भगवान विष्णूने अर्धे मनुष्य आणि अर्धे सिंहाचे शरीर धारण केले आणि राक्षसांचा राजा हिरण्यकशिपूचा वध केला. म्हणूनच या दिवशी नृसिंह जयंती साजरी केली जाते. यंदा नृसिंह जयंती ३० एप्रिलला म्हणजेच आज साजरी होत आहे.
कश्यप ऋषींच्या दोन मुलांपैकी एकाचे नाव हिरण्यकश्यपू होते. त्यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्माजींना प्रसन्न केले होते आणि देव, देवी, पुरुष, स्त्री, असुर, यक्ष किंवा इतर कोणताही प्राणी त्यांना मारू शकणार नाहीत तसेच ना दिवसा, ना रात्री, ना दुपारी, ना घरात, ना बाहेर, ना आकाशात, ना पाताळात, ना शस्त्राने, ना शस्त्राने. हे वरदान प्राप्त करून तो स्वतःला देव समजू लागला. तो स्वतःला देव समजू लागला होता. हिरण्यकश्यपू आपल्या प्रजेला त्याची पूजा करण्यास भाग पाडू लागला, जे त्याची पूजा करत नाहीत, त्यांचा तो विविध प्रकारे छळ करत असे. भगवान विष्णूच्या भक्तांवर त्यांला राग येऊ लागला होता. पण हिरण्यकश्यूपला प्रल्हाद नावाचा मुलगा झाला.
प्रल्हाद गर्भात असताना आई नारदाच्या आश्रमात होती. त्यामुळे त्याचा मोठा प्रल्हादावर झाला. भगवान विष्णूचे निस्सीम भक्त झाला. त्यांने हिरण्यकश्यपूच्या देवात्वालाच हरताळ फासला. दैवी कार्य तो करू लागला. हिरण्यकश्यपूला ही गोष्ट कळताच त्याने प्रल्हादला समजावले. त्याने आपल्या मुलाला सांगितले की मीच देव आहे, त्यामुळे तू आणि सर्व प्रजेने माझीच पूजा करावी. परंतु प्रल्हादाने वारंवार नकार दिला आणि भगवान विष्णूंवरील आपली भक्ती सोडली नाही. उलट तो अधिक व्यापकतेने करू लागला. हिरण्यकश्यूपने प्रल्हादला आपला अपमान समजून मारण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु श्री हरी विष्णूच्या कृपेने तो वाचत असे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ याप्रमाणे हिरण्यकश्यपूचे सगळे प्रयत्न व्यर्थ जात. त्यामुळे तो अधिक संतापला होता.
अखेर त्याने आपली बहीण होलिकाला प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत बसण्यास सांगितले. होलिकाला वरदान मिळाला होता की, की तिला अग्नी काही करू शकत नाही. पण जेव्हा होलिका प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत बसली तेव्हा श्रीहरीच्या कृपेने ती स्वतः त्या आगीत जळून गेली आणि प्रल्हाद वाचला. कारण वरदान सत्कार्य करणार्यांसाठी नव्हता तर दुष्कार्य करणाऱ्याविरोधात होलिका उभी राहिली तर तिला अग्नी काही करू शकणार नाही.. पण प्रल्हाद दैवी कार्य करत होता. त्यामुळे त्याला अग्नी काही करू शकली नाही. उलट होलिकेचा नाश झाला. शेवटी चिडलेल्या हिरण्यकश्यपूने आपला मुलगा प्रल्हाद याला एका खांबाला बांधले आणि त्याला मारण्यासाठी तलवार काढली आणि म्हणाला, मला सांग तुझा देव कुठे आहे, प्रल्हाद म्हणाला की या खांबात देव आहे, तू मला कुठे बांधले आहेस. हिरण्यकश्यपूला प्रल्हादचा वध करायचा होताच, नरसिंहाने खांबातून बाहेर पडून हिरण्यकश्यपचा वध केल्याने भगवान विष्णू अवतरले.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: नृसिंह जयंती हा दिवस नृसिंह अवताराच्या प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो.
Ans: अधर्माचा नाश करून भक्तांचे रक्षण करण्यासाठी विष्णू यांनी नृसिंह अवतार धारण केला.
Ans: राक्षस राजा हिरण्यकश्यपू याने मिळवलेल्या वरदानामुळे तो अहंकारी झाला. त्याचा मुलगा Prahlada हा विष्णूभक्त होता. त्याचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी नृसिंह रूप धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला.






