काम- घर आणि ऑफिसच्या धावपळीमुळे हार्मोनल स्ट्रेस वाढला आहे? मग दैनंदिन जीवनातील 'या' सवयींमध्ये करा बदल
महिलांच्या आरोग्यासाठी प्रभावी टिप्स?
हार्मोनल स्ट्रेस कमी करण्यासाठी उपाय?
महिलांमध्ये दिसून येणाऱ्या आरोग्यासंबंधित समस्या?
कामाची धावपळ, कौटुंबिक जबाबदारी, मुलांचा संभाळ, स्वयंपाक घर इत्यादी गोष्टींमध्ये महिला कायमच व्यस्थ असतात. धावपळीच्या जीवनशैलीमुळे महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. सर्वच महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना कायमच तोंड द्यावे लागते. शरीरात होणारे हार्मोनल बदल, मासिक पाळीच्या समस्या, अपचन वाढलेले वजन, पिरीएड्समधील अनियमितता इत्यादी अनेक कारणामुळे महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. बऱ्याचदा शरीरात दिसणाऱ्या गंभीर लक्षणांकडे महिला दुर्लक्ष करतात. वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे आजारांच्या लक्षणांकडे वाढ होते आणि जीवाला धोका निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. शरीरात वाढलेला हार्मोनल स्ट्रेस गंभीर आजार होण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे जीवनशैलीत केलेले हे बदल महिलांच्या आरोग्यासाठी प्रभावी ठरतील.(फोटो सौजन्य – istock)
झोपेतून उठल्यानंतर नियमित सकाळच्या कोवळ्या उन्हात १५ ते २० मिनिटं जाऊन बसल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. विटामिन डी शरीरासाठी फार महत्वाचे आहे. नियमित दहा मिनिट उन्हात जाऊन बसल्यास हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. कोवळं ऊन घेतल्यामुळे कॉर्टिसोलची पातळी अचानक वाढत नाही.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीराला पाण्याची खूप जास्त आवश्यकता असते. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. शरीरात जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. लघवी आणि घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडून जाते. थायरॉईड झाल्यानंतर नियमित सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी धण्याचे पाणी प्यावे. तसेच सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी प्यायल्यामुळे बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते.
दीर्घकाळ निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी नियमित शारीरिक हालचाली आणि ध्यान, प्राणायाम करणे आवश्यक आहे. शारीरिक हालचाली केल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होण्यासाठी मदत होते. तसेच दररोज १० मिनिटं चालल्यामुळे सूर्यप्रकाश घेता येतो आणि वेळेची खूप जास्त बचत होते. व्यायामासोबतच पोहणे, सायकलिंग आणि इतर गोष्टी करणे सुद्धा आवश्यक आहे. यामुळे मानसिक तणाव कमी होण्यासोबतच तुम्ही कायमच फ्रेश राहता.
आपल्यातील अनेकांना सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. कॉफी चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. पण असे न करता नाश्ता केल्यानंतर चहा कॉफीचे सेवन करावे. उपाशी पोटी चहा कॉफी प्यायल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढते आणि अपचनाच्या समस्या वारंवार उद्भवू लागतात. रिकाम्या पोटी चहा कॉफी प्यायल्यामुळे शरीरातील कॉर्टिसोलची पातळी वाढते. उपाशी पोटी चहा कॉफी पिण्याऐवजी कोमट पाणी प्यावे.
Ans: हार्मोनल स्ट्रेस म्हणजे शरीरातील हार्मोन्स (विशेषतः कोर्टिसोल) असंतुलित झाल्यामुळे निर्माण होणारा मानसिक आणि शारीरिक ताण.
Ans: थकवा, चिडचिड, झोप न लागणे, वजन वाढणे, त्वचेचे प्रश्न, केस गळणे ही सामान्य लक्षणे आहेत.
Ans: नियमित झोप, संतुलित आहार, व्यायाम, योग-ध्यान, स्क्रीन टाइम कमी करणे आणि वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.






