Rohit Sharma Birthday celebration (Image - ai gemini)
भारतीय क्रिकेट संघाची शान आहे रोहित शर्मा
रोहित शर्मा साजरा करतोय आपला 39 वा वाढदिवस
सिक्सर किंग म्हणून हिटमॅनची ओळख
Rohit Sharma Birthday Today: भारतीय क्रिकेटला एक मोठा इतिहास लाभला आहे. भारतीय क्रिकेट इतिहासात अनेक मोठा दिग्गज खेळाडू झाले आणि आताही घडत आहेत. काही खेळाडू आपले कर्तुत्व सिद्ध करून दाखवत आहे. आज आपण अशाच एका खेळाडूविषयी बोलणार आहोत. मुंबईचा राजा, हिटमॅन अशा विशेषणांनी ओळख असलेला आपला सर्वांचा लाडका रोहित शर्मा. आज रोहित शर्मा आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.
रोहित शर्मा मैदानावर असला की सामना भारतच जिंकणार असा आत्मविश्वास चाहत्यांना असतो. मैदानावर उतरला की चेंडू सीमारेषेबाहेर कसा जाईल याची गणितं मांडणारा फलंदाज, शांत डोकं आणि आक्रमक बॅटिंगचं समीकरण म्हणजे आपला ‘हिटमॅन’. बोरीवलीच्या गल्लीतून सुरू झालेला हा प्रवास आज जागतिक क्रिकेटच्या शिखरावर कसा पोहोचला, याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.
रोहित शर्मा नाव आठवले की आठवतात ते गगनचुंबी सिक्सर. त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. ते दुसरा कोणी खेळाडू मोडू शकेल असे वाटत नाही. त्याने आपल्या नावावर केलेल्या रेकॉर्डबाबत जाणून घेऊयात.
‘तुझ्या कॅप्टन्सीमध्ये माझे पदार्पण…’ हार्दिक झाला भावूक, रोहित शर्माने केली MI मध्ये 15 वर्ष पूर्ण
1. वन-डे फॉर्मटमध्ये रोहित शर्मा जबरदस्त खेळी करतो, हे आपण अनेक सामन्यात पाहिलेच आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 द्विशतके झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. श्रीलंकेविरुद्धची 264 रन्सची खेळी आजही क्रिकेट जगतातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
2. सिक्सर किंग: इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तीनही प्रकरांमध्ये सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रम रोहित शर्माने आपल्या नावावर केला आहे.
3. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये रोहितने एकूण 5 शतके ठोकली आहेत.
4. 2024 मध्ये भारताच्या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात टी -20 वर्ल्ड कप देखील जिंकला आहे.
यशस्वी कर्णधार
रोहित शर्माने आपली ओळख एक यशस्वी कर्णधार म्हणून निर्माण केली आहे. निस्वार्थी फलंदाजी हे रोहित शर्माचे खास वैशिष्ट्य आहे. त्याने भारतीय संघाला आशिया चषक आणि निधास ट्रॉफी जिंकवून दिली आहे. 2023 मध्ये सर्व सामने जिंकून त्याच्या नेतृत्वात भारताने फायनलमध्ये धडक मारली होती.
आयपीएलचा बादशाह
आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नावावर अनेक विक्रम आहेत. सर्वाधिक सिक्सर, एकाच टीमल अनेकदा विजेतेपद मिळवून देणे असे अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला 5 वेळा विजेतेपद पटकावून दिले आहे. फलंदाज म्हणूनही त्याने आयपीएलमध्ये 6000 हून रन्स केल्या आहेत.
Ro-Hit Man ‘ऑन फायर’; Mumbai Indians साठी केला ‘हा’ ‘विराट’ विक्रम, व्हाल थक्क
रोहित शर्माचे खेळणे कधी स्वतःसाठी नव्हते. तो कायम आपल्या संघासाठी खेळत आला आहे. यापुढेही तो त्या पद्धतीनेच खेळत राहणार आहे. कधी दुखापतींनी त्याला घेरलं, तर कधी टीकाकारांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या, पण प्रत्येक वेळी हा ‘मुंबईचा मुलगा’ फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेत पुन्हा उभा राहिला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्याचं नाव एका अशा ‘निस्वार्थी’ कर्णधाराच्या रूपात घेतलं जाईल, ज्याने स्वतःपेक्षा संघाला आणि आपल्या सहकाऱ्यांना नेहमीच मोठं केलं.






