Chandrapur News: ताडोबात खाणकामाला विरोध! पर्यावरण प्रेमी आक्रमक, वन्यजीव संकटात
२०१९ मध्ये नागपूर येथील एका पोलाद कंपनीने लोखंड खनिज ब्लाक लिलावात मिळविला. हा खाण प्रकल्प ब्रह्मपुरी वनविभागातील कक्ष क्र.४३९ मध्ये प्रस्तावित असून त्यासाठी सुमारे ३६ हेक्टर समृद्ध वनजमिनीचे वळण अपेक्षित आहे. या परिसरात दाट वनसंपदा व वाघ, बिबट, अस्वल, हरीण, मोर आदी वन्यजीवांचा वावर आहे. १६ आक्टोबर २०२३ ला राज्य वन्यजीव मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चीला गेला. पण मानव वन्यजीव संघर्ष स्फोटक बनल्यामुळे अभ्यास समिती नेमून पुढे ढकलला. या तीन समितीय सदस्य समितीने हा अहवाल तत्कालीन मुख्य वन्यजीव रक्षकांना सादर केला. त्यानंतर हा अहवाल व प्रस्ताव २४ जानेवारी २०२४ च्या वन्यजीव मंडळाच्या स्थायी समिती सदस्यांसमोर मांडण्यात आला. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्राथमिक अहवालात असं म्हटलं जात होतं की राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे निर्णयाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. आणि त्याचाच आधार घेऊन पुन्हा प्रकल्पाचा अभ्यास निर्णय घेतला. मंगळवारी (दि. ६) झालेल्या बैठकीत प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला. पर्यावरण तज्ज्ञांचा या प्रकल्पाला विरोध असूनही हा प्रकल्प मंजूर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ताडोबातील वनसंपत्तीचे जतन करण्यासाठी या प्रकल्पाला रद्द करण्याची मागणी जिल्ह्यातील वन्यप्रेमींमधून करण्यात आली आहे.
‘आम्ही तुम्हाला एक लाख रुपये देतो, फक्त असे भाषण दाखवा’; Uddhav Thackerayचे फडणवीसांना खुले आव्हान
कोणत्याही विकासकामांना आमचा विरोध नाही. पण जंगल क्षेत्रात जर खाण होत असेल तर वृक्ष व वन्यजीव हे उद्ध्वस्त होईल. आधीच ब्रह्मपुरी वनविभागात मोठ्या प्रमाणात मानव वन्यजीव संघर्ष पेटला असतानाच खाणीला मंजुरी देऊन त्या परिसरातील मानवी जीवन व वाघ, हरीण, बिबट व वन्यप्राणी यांचे जीवन उद्ध्वस्त होईल, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व नागझिरा व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा अतिशय महत्त्वाचा वाघांचा कॅरिडोर आहे. हा निर्णय म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला उध्वस्त करणारा निर्णय आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय रद्द करावा. – कवडू लोहकरे, वन्यजीव प्रेमी, चिमूर






