फोटो सौजन्य- pinterest
सनातन धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पवित्र नदीत स्नान, पिंडदान आणि तर्पण केले जाते. याशिवाय, 64 योगिनींच्या मूर्ती पिठापासून बनवल्या जातात त्यांची पूजा देखील केली जाते. 64 योगिनींना देवी शक्तीचे प्रतीक मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, ज्यांना 64 योगिनींचे विशेष आशीर्वाद मिळतात त्या लोकांना सुख, समृद्धी, संपत्ती, वैभव आणि सौभाग्य इत्यादी प्राप्त होतात, असे म्हटले जाते. दरम्यान काही लोक दीर्घायुष्यासाठी आणि पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत देखील पाळतात. यावेळी पिठोरी अमावस्या नेमकी कधी आहे, जाणून घ्या
पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीची सुरुवात 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11.55 वाजता होईल आणि या तिथीची समाप्ती 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11.35 वाजता होईल. उदयतिथीनुसार, शनिवार, 23 ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्येचे व्रत पाळले जाणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पिठोरी अमावस्येला कुशाग्रहणी पिठोरी अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते. याच्या दुसऱ्या दिवशीपासून भाद्रपद महिन्याची सुरुवात होते.
सूर्योदय – सकाळी 5.54
ब्रह्म मुहूर्त – सकाळी 4.26 ते 5.10
अभिजित मुहूर्त- सकाळी 11:58 ते दुपारी 12:50 पर्यंत
प्रदोष मुहूर्त- संध्याकाळी 06:53 ते रात्री 09:06 पर्यंत
सायहान संध्या- संध्याकाळी 06:53 ते रात्री 08
सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठून सर्व आवरुन झाल्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करुन पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण करावे. शक्य असल्यास गंगा नदीजवळ जाऊन तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर हात जोडून मनोभावे प्रार्थना करावी. पिठापासून 64 योगिनींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा करावी. त्यानंतर पिठोरी अमावस्येची कथा वाचावी किंवा ऐकावी. या व्रताच्या वेळी दान करणे देखील शुभ मानले जाते.
श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या किंवा कुशाग्रहणी पिठोरी अमावस्या असे म्हटले जाते. या दिवशी गोळा केलेला कुश खूप पवित्र मानला जातो. अमावस्येच्या दिवशी महिला मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, सुख-समृद्धीसाठी पिठोरी अमावस्येचे व्रत करतात. व्रताच्या दिवशी महिला 64 योगिनींच्या मूर्ती बनवून त्याची पूजा करतात.
ओम पितृ गणाया विद्महे जगत् धारिणी धीमही तन्नो पित्रो प्रचोदयात्।
ओम आद्य-भूतया विद्महे सर्व-सेवाया धीमही। शिव-शक्ती-स्वरूपें पितृ-देव प्रचोदयात् ।
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)