फोटो सौजन्य- pinterest
प्रदोष व्रत बुधवार, 17 डिसेंबर रोजी पाळले जाणार आहे. हे व्रत भगवान शिव यांना समर्पित आहे. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाच्या तेराव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळच्या वेळी हे व्रत पाळले जाते. यावेळी बुधवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला बुध प्रदोष व्रत म्हणतात. पुराणांनुसार जी व्यक्ती प्रदोष व्रताच्या वेळी काही उपाय करते त्या व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात. याशिवाय, प्रदोषाच्या दिवशी काही उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून सुटका होते आणि फायदा होतो. प्रदोष व्रताच्या दिवशी कोणते उपाय करायचे जाणून घ्या
वर्षातील शेवटचे प्रदोष व्रताची सुरुवात 16 डिसेंबर रोजी रात्री 11.58 वाजता झाली आहे आणि हे व्रत 18 डिसेंबर रोजी दुपारी 2.33 वाजेपर्यंत असणार आहे. या दिवशी बुधवार असल्याने याला बुध प्रदोष व्रत असेही म्हणतात. या काळात अनेक अनेक शुभ आणि दुर्मिळ योगायोग देखील घडणार आहे.
जर तुम्हाला व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळवायचे असेल तर प्रदोष व्रताच्या वेळी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन पाच वेगवेगळ्या रंगांच्या रांगोळीसह गोल फुलांची रांगोळी तयार करा. या रांगोळीच्या मध्यभागी तुपाचा दिवा लावा आणि हात जोडून महादेवांचे आशीर्वाद घेऊन आसनावर ध्यान करायला बसा.
जर तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून त्रास होत असेल आणि त्यांच्यापासून सुटका मिळवायची असेल, तर प्रदोष व्रताच्या दिवशी शमीचे पान स्वच्छ पाण्याने धुवा आणि ते शिवलिंगावर अर्पण करा आणि ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा 11 वेळा जप करावा.
जर तुम्ही एखाद्या खटल्यात अडकला असाल आणि त्यामुळे तुमच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढत असतील, तर प्रदोष व्रताच्या दिवशी सर्वांत पहिले धतुराची पाने स्वच्छ पाण्याने धुवावीत, नंतर ती दुधाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावीत.
तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी शिव मंदिरात जाऊन महादेवाला सुका नारळ अर्पण करा आणि तुमच्या आरोग्यासाठी महादेवांची प्रार्थना करा. प्रदोष काळामध्ये शिवमंदिरात जाऊन नारळ अर्पण करणे फायदेशीर ठरु शकते.
वैवाहिक जीवन चांगले राहण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांना दही आणि मध मिसळून अर्पण करा. तसेच शिव चालिसाचे पठण करावे.
तुमच्या संपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन तांदूळ आणि दुधाचे दान करणे फायदेशीर ठरेल.
जर तुम्हाला मानसिक त्रास जाणवत असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन महादेवांच्या मूर्ती किंवा चित्रांसमोर बसा. दीर्घ श्वास घेताना ‘ओम’ हा शब्द 5 वेळा मोठ्याने उच्चार करा.
वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी शिव मंदिरात जाऊन महादेव आणि देवी पार्वती यांच्यावर सात वेळा पवित्र धागा गुंडाळा आणि हा धागा मध्येच तुटू नये याची काळजी घ्यावी.
कुटुंबाच्या सुख आणि शांतीसाठी प्रदोष व्रताच्या दिवशी शिव मंदिरात जाऊन संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. देवांना प्रसन्न करण्यासाठी तुपाचा दिवा वापरला जातो तर इच्छा पूर्ण करण्यासाठी तेलाचा दिवा वापरला जातो.
तुमच्या मुलांशी असलेले नाते सुधारण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी एका भांड्यामध्ये थोडे मध घ्या आणि ते महादेवांना अर्पण करा. मध अर्पण केल्यानंतर उरलेले मध तुमच्या मुलांना हाताने खायला घाला.
तुमच्या कोणत्याही विशेष कामाच्या यशासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी दुधात थोडेसे केशर मिसळून शिवलिंगावर अर्पण करा आणि दूध अर्पण करताना मनात ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्रांचा जप करावा.
जर तुम्हाला व्यवसायात गुंतवणूक करण्यात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल, तर प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांना 11 बेलपत्र अर्पण करा आणि तुमच्या समस्येपासून सुटका व्हावी म्हणून महादेवांसमोर प्रार्थना करा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: बुध प्रदोष व्रत आज 17 डिसेंबर रोजी आहे
Ans: प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात, संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते.
Ans: मानसिक शांती, इच्छापूर्ती, कुटुंबातील सुख-समाधान आणि महादेवाची कृपा प्राप्त होते.






