फोटो सौजन्य- istock
रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणीच्या नात्यामधील नात दृढ करण्यासाठी एक खास सण मानला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंद आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. यंदा हा सण शनिवार, 9 ऑगस्ट रोजी आहे. मात्र रक्षाबंधनाच्या परंपरे संबधित अनेक श्रद्धा आहेत ज्याचे पालन बहिणी करावे. राखी बांधताना बहिणी त्यात 3 गाठी बांधतात. या गाठी बांधण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व, जाणून घ्या
शनिवार, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. या दिवशी ब्रम्ह मुहूर्त पहाटे 4.22 ते पहाटे 5.4 पर्यंत राहील. तर राखी बांधण्यासाठी मुहूर्त दुपारी 12 ते 12. 53 पर्यंत राहील हा अभिजित मुहूर्त सर्वोत्त्म मानला जातो. यावेळी बहिणींनी भावाला राखी बांधणे शुभ मानले जाते.
ओवाळणीच्या ताटामध्ये या गोष्टी असणे गरजेचे मानले जाते. त्यातील प्रत्येक वस्तूला विशेष असे महत्त्व आहे. या गोष्टींचा ताटामध्ये समावेश करणे खूप गरजेचे मानले जाते.
टिळक लावण्यासाठी कुंकू आणि तांदूळ
हळद – याला शुभतेचे प्रतीक मानले जाते.
नारळ – नारळाला समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
राखी – भावाच्या मनगटावर बांधण्यासाठी
दिवा – राखी बांधून झाल्यावर ओवाळण्यासाठी
मिठाई – ओवाळून झाल्यावर गोड पदार्थ भरवण्यासाठी मावा मिठाई किंवा खीर
ओवाळणीच्या ताटामध्ये या गोष्टी असणे खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा ताट अपूर्ण असल्याचे मानले जाते.
राखी बांधताना तीन गाठी बांधण्याची परंपरा खूप जुनी आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, या गाठींचा संबंध त्रिदेवांशी आहे म्हणजेच – ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी असल्याचे मानले जाते.
राखी बांधताना पहिली गाठ बांधण्याचा अर्थ भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी असा होतो.
राखी बांधताना दुसरी गाठ बांधण्याचा अर्थ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि शांतीसाठी असा होतो.
तर तिसऱ्या गाठीचा अर्थ भाऊ-बहिणीच्या नात्यात प्रेम आणि गोडवा टिकवून ठेवण्यासाठी असा होतो.
मान्यतेनुसार या तिन्ही गाठी बंध मजबूत करतात यामुळे जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते. म्हणून बहिणीने राखी बांधताना तीन गाठी बांधणे शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते.
रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नसून तो भाऊ आणि बहिणीच्या नात्यामधील अतूट प्रेम विश्वास दाखवतो. हा सण आपल्याला जीवनात नाती किती महत्त्वाची आहेत याची आठवण करून देतो. बहिणी आपल्या भावांच्या संरक्षणासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ आपल्या बहिणींच्या आनंदासाठी आणि सुरक्षिततेची देण्याचे वचन देतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)