फोटो सौजन्य- chatgpt
शिर्डीचे साईबाबा हे भारतातील सर्वाधिक पूजनीय संतांपैकी एक मानले जातात. त्यांच्या जीवनातील अनेक घटना आजही भक्तांसाठी श्रद्धेचा विषय आहेत. साईबाबा प्रथम शिर्डीत कसे आले, त्यांनी कडुलिंबाच्या झाडाखाली वास्तव्य का केले आणि त्यांना ‘साई’ हे नाव कसे मिळाले, याविषयी अनेक परंपरागत कथा सांगितल्या जातात. या कथांमधून त्यांची गुरुभक्ती, साधेपणा आणि सर्वधर्मसमभावाची शिकवण स्पष्ट होते.
आपले गुरू व्यंकुशाच्या परवानगीने साईबाबा भटकंती करत शिर्डीला पोहोचले त्यावेळी शिर्डीमध्ये एकूण 450 कुटुंब राहत होते. शिर्डीच्या सभोवताली घनदाट जंगल होतं. तिथे बाबांनी प्रथम खंडोबा मंदिराला भेट दिली आणि नंतर व्यंकुशाने सांगितलेल्या कडुलिंबाच्या झाडाकडे गेले. कडुलिंबाच्या झाडाभोवती एक ओटा बांधलेला होता. जिथे बाबा काही वेळ बसून भीक मागत आणि नंतर बाबा गावात भीक मागण्यासाठी निघत गावकऱ्यांनी त्यांना भिक्षा म्हणून भरपूर अन्न दिले ते खाऊन झाल्यानंतर उरलेले अन्न त्यांनी आपल्या मागे येणाऱ्या कुत्राला खाऊ घातले आणि मग कडुलिंबाच्या झाडाजवळ परत येऊन बसले हीच त्यांची रोजची दिनचर्या बनली.
कडुलिंबाच्या झाडाखाली बसण आणि उठणं, बसून ध्यान करणं ही मग गावामध्ये भीक मागण्यासाठी निघणं. काही लोकांनी कुतूहलाने त्यांना विचारलं की ते कडुलिंबाच्या झाडाखाली का राहतात? बाबांनी उत्तर दिलं त्यांच्या गुरूंनी इथे ध्यान केलं होतं म्हणून ते इथे विश्रांती घेतात. काही लोकांनी यावेळी त्यांची थट्टा केली आणि बाबांनी त्यांना सांगितलं जर त्यांनी काही शंका असेल तर त्यांनी या जागी खोदून पाहावं. गावकऱ्यांनी त्या जागी खोदलं आणि त्यांना तिथे खडक सापडला. दगड बाजूला केल्यानंतर तिथे एक दरवाजा दिसला जिथे चार दिवे तेवत होते तो दरवाजा एका गुहेत उघडत होता जिथे गाईसारखी रचना, लाकडी फळ्या आणि फुलांच्या माळा होत्या.
या घटनेनंतर लोकांच्या मनात बाबांविषयी भक्ती जागृत झाली. बाबांनी आपल्या पिशवीतून विट काढली ती दिव्याच्या समोर ठेवली आणि गावकऱ्यांना तो दरवाजा पुन्हा बंद करायला सांगितला. म्हाळसापती शामा आणि शिर्डीचे इतर भक्त या जागेला बाबांच्या गुरुजी समाधी मानत होते आणि त्यांना नेहमी वंदन करत असे. गावातील प्रतिष्ठित लोकांमध्ये म्हाळसापती आणि शामा हे बाबांची अनुयायी बनले. वैजामाई नावांची स्त्री होती ती दररोज बाबांना भिक्षा देत असे. जर बाबा भिक्षा घेईला येऊ शकले नाही तर ती बाबांना कडुलिंबाच्या झाडाजवळ जाऊन स्वतः त्यांना भिक्षा देई.
बाबा हिंदू होते की मुस्लिम यांवरून गावातील हिंदू मुस्लिमांमध्ये नेहमी वाद सुरू होता. तीन महिन्यानंतर कोणालाही न कळवता बाबा शिर्डी सोडून निघून गेले. त्यांचा अनेकांनी शोध घेतला पण ते सापडले नाही. अचानक तीन वर्षांनंतर धूपखेडामधील मुस्लिम जमीनदार चांद पाशा पाटील यांच्यासोबत त्यांच्या वहिनीच्या लग्नात पाहुणे म्हणून परत आले.
यावेळी एक तरुण फकिराच्या वेशात बाबा म्हाळसापतीच्या घरी गेले आणि म्हाळसापतींनी त्यांना या साई आहो साई असं म्हणत स्वागत केलं तेव्हापासूनच त्यांना साईबाबा असं नाव पडलं, अशी कथा मानली जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: परंपरागत कथांनुसार, साईबाबा आपल्या गुरू व्यंकुश (वेंकुशा) यांच्या आज्ञेनुसार भ्रमंती करत प्रथम शिर्डीत आले.
Ans: परंपरेनुसार, शिर्डीतील खंडोबा मंदिराचे पुजारी म्हाळसापती यांनी "या साई!" असे संबोधल्यानंतर त्यांना 'साईबाबा' हे नाव मिळाले.
Ans: भक्तपरंपरेनुसार, त्या ठिकाणी साईबाबांच्या गुरूंनी तपश्चर्या केली होती. त्यामुळे साईबाबा त्या जागेला अत्यंत पवित्र मानत असत.






