Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून
Maharashtra to National And International Breaking News:
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांकडून पेट्रोलमधील २० टक्के इथेनॉलच्या (E20) ब्लेंडिंगचे जोरदार समर्थन केले जात आहे. दुसरीकडे या इंधनामुळे जुन्या गाड्यांच्या इंजिनचे नुकसान होत असल्याच्या तक्रारींवरून सोशल मीडियावर ‘E20 जनता पार्टी’ स्थापन करत व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. केंद्र सरकारच्या दबावामुळेच वाहन उत्पादक कंपन्या २०२३ पूर्वीच्या गाड्यांसाठी ई-२० पेट्रोल सुरक्षित आहे की नाही, याबाबत सार्वजनिकपणे सत्य सांगायला घाबरत असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.
30 Jul 2026 06:32 PM (IST)
पुणे: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या सौजन्याने आयोजित ‘डीएसपी करंडक मान्सून लीग’ मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत पुणेरी स्ट्रायकर्स क्लब आणि कॉर्पोरेट क्रशर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांवर (Cricket) मात करत स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे.
30 Jul 2026 06:28 PM (IST)
NTT DATA: भारताची डिजिटल कॉमर्स इकोसिस्टिम जसजशी विस्तारत आहे, तसतसे व्यापारी आणि उद्योग एकाच व्यासपीठावर पेमेंट्स, कॉमर्स आणि व्यवसाय कार्ये एकत्र आणणारे एकात्मिक उपाय शोधत आहेत. या बदलाला प्रतिसाद देत, NTT DATA पेमेंट सर्व्हिसेस इंडियाच्या वतीने आज ADAPTIS हा त्याचा पेमेंट आणि कॉमर्स उपायांसाठीचा एकीकृत सेवा ब्रँड सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.
30 Jul 2026 06:21 PM (IST)
राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक अल्पसंख्याक प्रमाणपत्र किंवा दाखल्याची सक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाने दिले आहेत. शासनाने विहित केलेले वैध पुरावे ग्राह्य धरून विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यास सांगितले असून, केवळ प्रमाणपत्राच्या अभावी कोणताही पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश सर्व शैक्षणिक संस्थांना देण्यात आले आहेत.
30 Jul 2026 06:08 PM (IST)
मराठवाड्याला यंदाच्या पावसाळ्यातला पहिला रेड अलर्ट
30 Jul 2026 05:58 PM (IST)
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ( Commonwealth Games 2026) भालाफेक स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राने पात्रता फेरीत पाचवे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. फक्त नीरजच नाही तर, तर भारताचे तिन्ही भालाफेकपटूने पात्रता फेरीतील आव्हान यशस्वीपणे पार केले. रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही दमदार कामगिरी करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. पात्रता फेरीत अठरा खेळाडूंना प्रत्येकी तीन संधी मिळाल्या होत्या, तर नीरजने फक्त दोनच संधी साधल्या. त्याची सर्वोत्तम फेक ७९.६१ मीटर होती, ज्यामुळे तो पाचव्या स्थानावर राहिला. या फेरीतील, अव्वल १२ खेळाडू अंतिम फेरीत पोहोचले. अंतिम फेरी ३१ जुलै रोजी मध्यरात्री १२:४५ च्या वाजता सुरू होईल
30 Jul 2026 05:43 PM (IST)
रायगड जिल्हा पोलिसांच्या नेरळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत रायगड जिल्ह्यातील चार आणि नवी मुंबईतील एका अशा एकूण पाच गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला असून, चोरीस गेलेल्या सुमारे ₹4.78 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
30 Jul 2026 05:33 PM (IST)
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने राज्यातील रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभर या विषयावर मोठी चर्चा सुरू झाली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली असून, विविध राजकीय पक्षांकडून समर्थन, विरोध आणि श्रेय घेण्याची स्पर्धाही पाहायला मिळाली. मात्र, या सर्व राजकीय घडामोडींना बाजूला ठेवून मीरा-भाईंदरमधील रिक्षाचालकांनी मराठी शिकण्याला प्राधान्य दिल्याचे नवराष्ट्र डिजिटलच्या ग्राउंड रिपोर्टमधून समोर आले आहे.
30 Jul 2026 05:22 PM (IST)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा हे देशातील प्रत्येक मुलाला दर्जेदार आणि समान शिक्षण देण्याच्या ध्येयावर आधारित आहेत. मात्र, प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळीच कहाणी सांगते. संसदेत सादर करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात १,००,८४३ शाळा अशा आहेत, जिथे संपूर्ण शाळेची जबाबदारी एकाच शिक्षकावर आहे. अशा लाखांहून अधिक शाळांमध्ये एकच शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतोही, शाळेचे रेकॉर्डही सांभाळतो, शासकीय योजनांचे काम करतो आणि प्रशासकीय जबाबदाऱ्याही पार पाडतो.
30 Jul 2026 05:11 PM (IST)
लोकसभेत मंजूर झाल्यानंतर, ‘पेपर लीक’ विरोधी विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडण्यात आले. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी वरिष्ठ सभागृहात हे विधेयक सादर केले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन (Mallikarjun Kharge) खर्गे यांनी या विधेयकावरील चर्चेची सुरुवात केली. चर्चेदरम्यान त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
30 Jul 2026 04:59 PM (IST)
पुण्यात शाळा परिसरात जंक फूडच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळांच्या परिसरात आणि कॅन्टीनमध्ये जंक फूडला आळा घालण्याच्या या निर्णयाचे पालकांकडून स्वागत होत आहे.
30 Jul 2026 04:49 PM (IST)
नाफेडकडून कांदा खरेदीच्या दरात वाढ करण्यात आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बाजारभावातील चढ-उतार आणि उत्पादन खर्चामुळे अडचणीत असलेल्या कांदा उत्पादकांसाठी नाफेडच्या सुधारित खरेदी दराचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
30 Jul 2026 04:38 PM (IST)
नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आणखी एका व्यक्तीचा बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खराब रस्ते, मोठमोठे खड्डे आणि पावसामुळे निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती वाहनचालकांच्या जीवावर बेतत आहे.
30 Jul 2026 04:26 PM (IST)
गुन्ह्याच्या तपासासाठी पुण्यातील विश्रामबागेतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी साताऱ्यात गेले होते....यावेळी पोलिसांनी तपासाऐवजी कास पठारावर जाऊन वर्षाविहाराचा आनंद लुटल्याचा प्रकार समोर आलाय.. यात महिला पोलीस अधिकाऱ्यासह 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे... विभागीय चौकशीत कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध झालंय... दरम्ययान संबंधित पोलिसांची 2 वर्षांची वेतनवाढ रोखण्यात आलीय...
30 Jul 2026 04:13 PM (IST)
जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप याने सन २०१२ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार तरुणीने पोलिस ठाण्यात दिली आहे. तसेच मंगेश यांनी तरुणीची तब्बल ८ ते १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ करत असून, आरोपीच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत."
30 Jul 2026 04:06 PM (IST)
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरु आहे. चिन्ह हे पक्षासाठी महत्वाचे आहे, असा युक्तिवाद त्यांनी यावेळी केला.
30 Jul 2026 04:00 PM (IST)
नरीमन पॉईंट येथील एअर इंडिया इमारतीत मंत्रालयाचे काम लवकरच सुरु होणार
नव्या इमारतीत कॅबिनेट सभागृहाचे काम सुरु होणार
मंत्रालयातील कॅबिनेट हॉल एअर इंडियाच्या टॉप फ्लोअरवर हलवण्याचा विचार
30 Jul 2026 03:55 PM (IST)
व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर विजय चौधरींचा राजीनामाभाजपच्या उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामामाझ्यामुळे पक्षाची बदनामी नको' म्हणत राजीनामा
30 Jul 2026 03:45 PM (IST)
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोळसा खाणप्रकरणी क्लीन चीट
सुप्रीम कोर्टाने खटला केला बंद, समन्सचा आदेशही रद्द
मनमोहन सिंग यांना फौजदारी प्रकरणातून औपचारिकरित्या निर्दोष ठरवले
30 Jul 2026 03:35 PM (IST)
संभाजीनगरहून परभणीकडे येणारी वसमत आगाराची एमएच 20 बीएल 2240 क्रमांकाची एसटी बस जिंतूर तालुक्यातील चांदज गावाजवळ रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी होऊन अपघातग्रस्त झाली. या अपघातामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.प्राप्त माहितीनुसार, अपघातावेळी बसमध्ये एकूण ५१ प्रवासी प्रवास करत होते.
30 Jul 2026 03:30 PM (IST)
Satara DCCB Election: जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यातील विविध विकास सोसायट्यांच्या ठरावांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे होमपीच समजल्या जाणाऱ्या आखाडे गावातील विकास सोसायटीच्या ठरावाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
30 Jul 2026 03:25 PM (IST)
भारतीय हॉकी संघाच्या नवीन जर्सीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. आगामी पुरुष आणि महिला हॉकी विश्वचषकांच्या पार्श्वभूमीवर, हॉकी इंडियाने संघाची पारंपरिक निळी जर्सी बदलून भगव्या रंगाची जर्सीचे अनावरण केले आहे. भारताचा माजी कर्णधार विरेन रासकिन्हाने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून, भारतीय हॉकीची ओळख बनलेला निळा रंग बदलण्याची काय गरज होती, असा प्रश्न उपस्थित केला आहे. आता हॉकी इंडियाने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
30 Jul 2026 03:15 PM (IST)
E-Pik Pahani National Level: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. आपल्या शेतातील पिकांची अचूक नोंद करण्यासाठी आता शेतकऱ्यांच्या मदतीला एक नवीन स्मार्ट सोबती ‘पीक पाहणी नोंदणी सहाय्यक’ उपलब्ध होणार आहेत. राज्य शासनाच्या इ पीक पाहणी प्रकल्पाची केंद्र शासनाने दखल घेतली असून या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
30 Jul 2026 03:03 PM (IST)
Government Jobs 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट महिन्यापासून अनेक केंद्रीय आणि राज्यस्तरीय विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. रेल्वे, बँकिंग, इस्रो, एम्स आणि राज्य सरकारांच्या विविध विभागांमध्ये हजारो रिक्त पदांसाठी अर्ज मागवले जातील. याशिवाय अशाही अनेक भरती आहेत, ज्यांची अर्ज प्रक्रिया आधीपासूनच सुरू असून त्यांची शेवटची तारीख ऑगस्टमध्ये आहे. त्यामुळे उमेदवारांकडे एकाच वेळी अनेक संधी उपलब्ध असतील. चला तर मग जाणून घेऊया, भारत सरकारमध्ये नोकरी मिळवण्याच्या कोणत्या मोठ्या संधी येत आहेत आणि येत्या काही महिन्यांत कोणत्या नवनवीन जागा निघणार आहेत.
30 Jul 2026 03:00 PM (IST)
Government Jobs 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट महिन्यापासून अनेक केंद्रीय आणि राज्यस्तरीय विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. रेल्वे, बँकिंग, इस्रो, एम्स आणि राज्य सरकारांच्या विविध विभागांमध्ये हजारो रिक्त पदांसाठी अर्ज मागवले जातील. याशिवाय अशाही अनेक भरती आहेत, ज्यांची अर्ज प्रक्रिया आधीपासूनच सुरू असून त्यांची शेवटची तारीख ऑगस्टमध्ये आहे. त्यामुळे उमेदवारांकडे एकाच वेळी अनेक संधी उपलब्ध असतील. चला तर मग जाणून घेऊया, भारत सरकारमध्ये नोकरी मिळवण्याच्या कोणत्या मोठ्या संधी येत आहेत आणि येत्या काही महिन्यांत कोणत्या नवनवीन जागा निघणार आहेत.
30 Jul 2026 02:55 PM (IST)
Sanjay Raut PC: “देशाचे गृहमंत्री कुठे आहेत? त्यांना शोधावे लागत आहे. ‘लापता लेडीज’ नावाचा सिनेमा आला होता, आता ‘लापता गृहमंत्री’ नावाचा सिनेमा काढावा लागेल. विरोधी पक्षनेते राहुल गांधी तुमच्यावर गंभीर आरोप करत आहेत, मग तुम्ही समोर येऊन उत्तर का देत नाही?” असा खोचक प्रश्न विचारत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शिंदे गट, तसेच योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर शाह यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला.
30 Jul 2026 02:45 PM (IST)
नागपूर: राज्यात जुलैच्या सुरुवातील पेरणीने वेग धरला. त्यानंतर पेरणी रखडली. त्याचा परिणाम पेरणी क्षेत्रावर झाला असल्याचे अहवालातून स्पष्ट होते जुलैअखेर राज्यात अपेक्षित क्षेत्रापैकी ८८ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. त्यात सर्वाधिक ३७.८ टक्के क्षेत्रामध्ये सोयाबीनचा पेरा झालेला आहे त्याखालोखाल ३०.६ टक्के क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आल्याचे कृषी विभागाने २७ जुलैच्या अखेरच्या पेरणी अहवालात नमूद केले आहे.
30 Jul 2026 02:35 PM (IST)
भारतीय हॉकी संघाच्या नवीन जर्सीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. आगामी पुरुष आणि महिला हॉकी विश्वचषकांच्या पार्श्वभूमीवर, हॉकी इंडियाने संघाची पारंपरिक निळी जर्सी बदलून भगव्या रंगाची जर्सीचे अनावरण केले आहे. भारताचा माजी कर्णधार विरेन रासकिन्हाने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून, भारतीय हॉकीची ओळख बनलेला निळा रंग बदलण्याची काय गरज होती, असा प्रश्न उपस्थित केला आहे. आता हॉकी इंडियाने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
30 Jul 2026 02:30 PM (IST)
India Vs Bangladesh Tour Updates: सध्या भारतीय क्रिकेट संघ लवकरच श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळणार आहे. पुढील काही महिने भारतीय संघाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आणि गडबडीचे असणार आहे. लागोपाठ अनेक सिरिज भारतीय संघ खेळणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात बांग्लादेश आणि भारत यांच्यात सिरिज खेळवली जाण्याची शक्यता आहे. भारत बांग्लादेश दौऱ्यावर जाणार की नाही याबाबत अद्याप माहिती प्राप्त झाली नसली तरी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तमीम इकबाल यांनी याबाबत भाष्य केले आहे. ऑगस्टमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
30 Jul 2026 02:25 PM (IST)
नांदेड : पोलीस कोठडीतील मृत्यू (कस्टोडिअल डेथ) प्रकरणांना आळा घालण्यासाठी आणि तपास प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने मंगळवारी (२८ जुलै) सर्वसमावेशक मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय व राज्य मानवाधिकार आयोग तसेच भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम यांच्या तरतुदींचा समावेश करून हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
30 Jul 2026 02:20 PM (IST)
तामिळनाडूतील तिरुवण्णामलाई येथील अरुणाचल पर्वतावरील एका अरुंद दगडी मार्गाला ‘मोक्ष मार्ग’ म्हटले जाते. या अरुंद जागेत घुसून जर तुम्ही इथून बाहेर पडलात तर तुम्हाला मोक्ष मिळेल असा काहींचा समज आहे. परंतु वास्तवात हा एक धोकादायक मार्ग असून याला कोणतीही अधिकृत धार्मिक मान्यता नाही. मागेच या अरुंद खडकाळ मार्गात अडकल्यामुळे आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे राजमहेंद्रवरम येथील ३६ वर्षीय मणिकुमार यांचा मृत्यू झाला. या घटनेला काही दिवस उलटले असून सोशल मिडियावर एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात आणखी एक महिला या धोकादायक मार्गेत वाईटरित्या अडकल्याचे दिसते.
credit - social media and Instagram
30 Jul 2026 02:10 PM (IST)
Sanjay Raut PC: “देशाचे गृहमंत्री कुठे आहेत? त्यांना शोधावे लागत आहे. ‘लापता लेडीज’ नावाचा सिनेमा आला होता, आता ‘लापता गृहमंत्री’ नावाचा सिनेमा काढावा लागेल. विरोधी पक्षनेते राहुल गांधी तुमच्यावर गंभीर आरोप करत आहेत, मग तुम्ही समोर येऊन उत्तर का देत नाही?” असा खोचक प्रश्न विचारत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शिंदे गट, तसेच योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर शाह यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला.
30 Jul 2026 02:00 PM (IST)
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल खेळांच्या (Commonwealth games 2026) ७ व्या दिवशी भारताने ऐतिहासिक कामिगिरी केली. भारताने पॅरा ॲथलेटिक्समधील पुरुषांच्या १०० मीटर T47 अंतिम शर्यतीत सुवर्ण आणि रौप्य दोन्ही पदके जिंकण्यात यश मिळवले. दिलीप महादू गावितने पुरुषांच्या १०० मीटर T47 प्रकारात १०.७१ सेकंदांचा विक्रम प्रस्थापित करून सुवर्णपदक जिंकले. तर मोहम्मद बासिल मोरसिंघनकथने १०.८३ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले. यासह भारताच्या खात्यात एकूण तीन सुवर्णपदकांची भर पडली असून, पदकांची एकूण संख्या १५ झाली आहे. पुरुषांची १०० मीटर T47 ही स्पर्धा शारीरिक अपंगत्व असलेल्या किंवा एक हात नसलेल्या खेळाडूंसाठीची एक पॅरा-ॲथलेटिक्स स्प्रिंट स्पर्धा आहे.
30 Jul 2026 01:55 PM (IST)
जागतिक शेअर बाजारात मंगळवारी एक महत्त्वाची घडामोड पाहायला मिळाली. (I-Phone) आयफोन बनवणारी ॲपल कंपनी काही काळासाठी तब्बल 5 ट्रिलियन डॉलर्सच्या(Trillion Dollars) बाजारमूल्याच्या पुढे गेली. हा टप्पा गाठणाऱ्या मोजक्याच कंपन्यांमध्ये आता (I-Phone) ॲपलचाही समावेश झाला आहे. यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात कंपनीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
30 Jul 2026 01:50 PM (IST)
रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील काही वर्षांपासून सुरू असलेले युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र आणि भयानक वळण घेत आहे. दोन्ही देशांकडून हवाई दलाचा आणि आधुनिक शस्त्रास्त्रांचा प्रचंड वापर केला जात आहे. याच दरम्यान युक्रेनियन हवाई दलाच्या (Ukrainian Air Force) ताफ्यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. युक्रेनच्या हवाई दलाने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून माहिती दिली आहे की, बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक युद्धमोहिमेदरम्यान त्यांचे अमेरिकानिर्मित F-16 लढाऊ विमान (F-16 Fighter Jet) अपघातग्रस्त होऊन कोसळले.
30 Jul 2026 01:45 PM (IST)
विठ्ठलभक्तीचा सुगंध दरवळवणारं ‘पालखी निघाली वारीला’ हे नवं भक्तिगीत संगीतप्रेमींच्या भेटीला आलं आहे. या गीताला ग्रॅमी पुरस्कार विजेते आणि पद्मश्री शंकर महादेवन तसेच मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सन्मानित गायिका रीवा राठोड यांनी आपल्या सुरेल आवाजाने सजवलं आहे.या गीताचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ गायक-संगीतकार रूपकुमार राठोड आणि गायिका सुनाली राठोड यांची कन्या रीवा राठोड हिने याच गाण्यातून मराठी गायनात पदार्पण केलं आहे. तिच्या या सुरेल प्रवासाबद्दल रूपकुमार राठोड यांनीही आनंद व्यक्त करत मुलीच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.
30 Jul 2026 01:40 PM (IST)
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या 8व्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. पगारात किती वाढ होणार, फिटमेंट फॅक्टर किती असेल आणि किमान वेतन किती मिळेल, याबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र, यावेळी चर्चेचा केंद्रबिंदू केवळ महागाई भत्ता किंवा वेतनवाढ नाही, तर पगार ठरवण्याची पद्धत बदलण्याचा प्रस्ताव आहे. आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन ठरवताना एका ठरावीक कुटुंबाचा विचार केला जात होता. पण आता या पद्धतीत बदल करण्याची मागणी पुढे आली आहे.
30 Jul 2026 01:35 PM (IST)
राज्यात व्यसनाधीनतेविरोधात जनजागृती करण्यासाठी राज्य सरकारने राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाला सुरुवात केली आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यभर व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
30 Jul 2026 01:30 PM (IST)
“देशाचे गृहमंत्री कुठे आहेत? त्यांना शोधावे लागत आहे. ‘लापता लेडीज’ नावाचा सिनेमा आला होता, आता ‘लापता गृहमंत्री’ नावाचा सिनेमा काढावा लागेल. विरोधी पक्षनेते राहुल गांधी तुमच्यावर गंभीर आरोप करत आहेत, मग तुम्ही समोर येऊन उत्तर का देत नाही?” असा खोचक प्रश्न विचारत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शिंदे गट, तसेच योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर जोरदार टीका केली.
30 Jul 2026 01:25 PM (IST)
“संविधानाच्या रस्त्यावर चालून विरोध प्रदर्शन करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो घेऊ जय भीमचे नारे देणे, महात्मा गांधींचे फोटो घेऊन आंदोलन करणे हे संस्कृती बदनाम करण्यासारखे आहे, तर हो आम्ही संस्कृती बदनाम करत आहोत. तुम्ही जे पतंजलीचे जे उत्पादने बनवत आहात, त्याकडे लक्ष केंद्रीत करा”. अशा शब्दांत कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी रामदेव बाबांना प्रत्युत्तर दिले आहे.
30 Jul 2026 01:15 PM (IST)
पुण्यातील प्रभाग 12 मधील घोले रोड येथे असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या महापौर यांच्या निवासस्थानास रामदूत असे नाव देण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकाने केली आहे. भाजपचे नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी ही मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन रविंद्र साळेगावकर यांनी पुणे महापालिका नगरसचिव आयुक्तांना दिले आहे. या मागणीला भाजपच्या अनेक नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. नगरसेवक सुनील पांडे, नगरसेवक अपूर्व खाडे, नगरसेविका निवेदिता एकबोटे, नगरसेविका पुजा जागडे, नगरसेविका अमृता मेहेत्रे, नगरसेविका पल्लवी जावळे यांनी या निवेदनात सह्या करून पाठिंबा दिला आहे.
30 Jul 2026 01:05 PM (IST)
मध्यपूर्वेत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या भीषण आणि विनाशकारी युद्धाच्या पार्श्वभूमीवर, धार्मिक व ऐतिहासिक स्थळांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे तणाव पुन्हा एकदा अत्यंत भीषण वळणावर पोहोचला आहे. गाझा (Gaza) शहराच्या उत्तर भागातील अत्यंत गजबजलेल्या आणि विस्थापित नागरिकांची मोठी वस्ती असलेल्या परिसरात स्थित ऐतिहासिक अल-मुत्ताकीन मशिदीवर इस्रायली हवाई दलाने (IAF) प्राणघातक आणि भीषण हवाई हल्ला केला. या हल्ल्यात शतकानुशतकांचा वारसा जपणारी मशिदीची मुख्य वास्तू पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. हल्ल्याच्या वेळी झालेल्या प्रचंड स्फोटामुळे आकाशात आगीच्या ज्वाळा आणि धुराचे अक्राळविक्राळ लोट उसळले.
30 Jul 2026 01:01 PM (IST)
पुण्यातील प्रभाग 12 मधील घोले रोड येथे असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या महापौर यांच्या निवासस्थानास रामदूत असे नाव देण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकाने केली आहे. भाजपचे नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी ही मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन रविंद्र साळेगावकर यांनी पुणे महापालिका नगरसचिव आयुक्तांना दिले आहे. या मागणीला भाजपच्या अनेक नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. नगरसेवक सुनील पांडे, नगरसेवक अपूर्व खाडे, नगरसेविका निवेदिता एकबोटे, नगरसेविका पुजा जागडे, नगरसेविका अमृता मेहेत्रे, नगरसेविका पल्लवी जावळे यांनी या निवेदनात सह्या करून पाठिंबा दिला आहे.
30 Jul 2026 12:48 PM (IST)
"पोलिस तुमच्या सेवेसाठी" हे ब्रीदवाक्य मिरविणाऱ्या पुणे पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांनी मात्र गुन्ह्याच्या तपासालाच पर्यटनाची जोड देत पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारा प्रकार केला आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्याचा तपासासाठी तक्रारदार महिलेला सोबत घेऊन साताऱ्यात गेलेल्या विश्रामबाग पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी तसेच पोलिस अंमलदारांनी तपासाऐवजी दिवसभर पर्यटन, ढाब्यावर मेजवानी आणि पाहुणचाराचा आनंद लुटल्याचा धक्कादायक प्रकार विभागीय चौकशीत उघड झाला आहे. या गंभीर गैरवर्तनाची दखल घेत अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी तिघांची सलग दोन वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवाडे, पोलिस हवालदार श्रीहरी पाटील आणि महिला पोलिस कर्मचारी कोमल कांबळे अशी वेतनवाढ रोखण्यात आलेल्यांची नावे आहेत.
30 Jul 2026 12:36 PM (IST)
30 Jul 2026 12:24 PM (IST)
30 Jul 2026 12:12 PM (IST)
सिल्लोडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिल्लोड शहरात बुधवारी (२९ जुलै) अज्ञात व्यक्तीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील अनोळखी आहे. त्याचा मृतदेह सिल्लोड-भोकरदन मार्गावरील एका पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीच्या संरक्षक भिंतीलगत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळावरून रक्ताने माखलेला कटर तसेच सुमारे ५०० ते ६०० ग्रॅम वजनाचा सिमेंटचा तुकडा जप्त केला आहे. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध मार्गानी तपास करत आहेत.
30 Jul 2026 11:44 AM (IST)
Students deserve justice.
An independent SC monitored high powered committee must be constituted to probe brutalities against our students. pic.twitter.com/pZATUeAjwC
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 30, 2026
30 Jul 2026 11:06 AM (IST)
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक भावूक व्हिडीओ शेअर करत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) निवृत्तीची घोषणा केली आहे. रहाणेच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात आणि जगभरातील त्याच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
30 Jul 2026 10:55 AM (IST)
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण: पार्ट १’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित अधिकृत ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे(Ramayana Trailer Out) . ३० जुलै २०२६ रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भारतीय भाषांमध्ये ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. दिवाळी २०२६ मध्ये हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून त्याचे जागतिक वितरण सोनी पिक्चर्स करणार आहे. उत्तर भारतातील वितरणाची जबाबदारी धर्मा प्रोडक्शन्सकडे सोपवण्यात आली आहे.
30 Jul 2026 10:45 AM (IST)
मित्रांसोबत फिरायाला गेलो की बजेट एकत्र वाटून घेण्याचा मुद्दा येतोच. मग कॅल्क्युलेटर हातात घ्या, खर्चाचे हिस्से करा हा सर्व ताण आलाच. यामध्ये अनेकदा किती लोकांनी पेमेंट केलं, किती लोकांनी नाही याबाबतही कन्फ्यूजन निर्माण होतं. हाच त्रास कमी करण्यासाठी आता ऑनलाईन पेमेंट ॲप पेटीयमने (Paytm) एक खास फिचर लाँच केले आहे . या नव्या फिचरचे नाव आहे ‘Split Bills’. या फिचरचा वापर करुन तुम्ही मित्रांसोबतही ट्रीप आणखी मजेदार बनवू शकता. याच्या मदतीने यूजर्स एकाच जागी ग्रुप एक्सपेंसेस रिकॉर्ड करु शकतात, प्रत्येकाचा शेअर कॅल्क्युलेट करु शकतात आणि पेमेंट सेटलमेंट देखील योग्य रितीने पार पाडू शकतात. हे फिचर पेटीयमवर उपलब्ध झाले असून यूजर्सना फ्रीमध्ये याचा वापर करता येणार नाही. म्हणजेच हे फिचर वापरण्यासाठी कंपनी तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेणार नाही.






