भाजी बनवायचा कंटाळा आला आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा बेबी पोटॅटो मसाला, पावसाळ्यात करा गरमागरम बेत
रात्रीच्या जेवणात किंवा डब्यासाठी नेमकी काय भाजी बनवावी, बऱ्याचदा सुचत नाही. जेवणात सगळ्यांचं चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. कढधान्य किंवा पालेभाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याचा लहान मुलं हट्ट करतात. मुलांना बटाटा, कोबी इत्यादी ठराविक भाज्या खायला खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बेबी पोटॅटो मसाला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी हा पदार्थ उत्तम आहे. बेबी पोटॅटो योग्य पद्धतीमध्ये बनवल्यास चव अतिशय सुंदर लागते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. लहान आकाराचे बटाटे कायमच टोपात शिजवावे. कुकरमध्ये शिजवल्यास ते पूर्णपणे मऊ होऊन पदार्थ व्यवस्थित तयार होत नाही. बेबी पोटॅटो भाजून किंवा उकडवून खाल्ला जातो. चला तर जाणून घेऊया बेबी पोटॅटो मसाला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






