फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर तीळ असतो. काहींना जन्मापासून तीळ असतात, तर काहींना जन्मानंतर कधीतरी ते दिसतात. काहीलोक तीळ हे एक चिन्ह मानतात. सामुद्रिक शास्त्रामध्ये तीळ हे एक अतिशय खास आणि महत्त्वाचे चिन्ह मानले जाते. सामुद्रिक शास्त्रानुसार, शरीरावर असलेले तीळ व्यक्तीचा स्वभाव, भाग्य, संपत्ती आणि जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी दर्शवतात. जर एखाद्या व्यक्तीच्या ओठांच्या उजव्या बाजूला तीळ असल्यास व्यक्तीचा जीवनावर कसा परिणाम होतो ते जाणून घ्या
सामुद्रिक शास्त्रात शरीराच्या कोणत्या भागात तीळ आहे आणि कोणत्या बाजूला आहे, त्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. तिळांचे शुभ आणि अशुभ परिणाम देखील पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे मानले जातात. तीळ केवळ सौंदर्याचे प्रतीकच नाही तर ते एक प्रतीक देखील मानले जाते.
सामुद्रिक शास्त्रानुसार, पुरुषाच्या शरीराच्या उजव्या बाजूला तीळ असणे शुभ मानले जाते. असे पुरुष जीवनात प्रगती करतात आणि समाजात आदर मिळवतात. तसेच ज्या महिलांच्या उजव्या बाजूला तीळ असते अशा लोकांसाठी ते अशुभ लक्षण मानले जाते. अशा लोकांना जीवनामध्ये चढ उताराचा सामना करताना दिसून येतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या पुरुषाच्या वरच्या ओठाच्या उजव्या बाजूला तीळ असतो ती व्यक्ती खूप भाग्यशाली समजली जाते. असे लोक खूप श्रीमंत असतात आणि त्यांना जीवनामध्ये कधीही पैशांची समस्या कमतरता जाणवत नाही. त्यांना जीवनामध्ये अनेक सुखसोयी मिळतात. दरम्यान असे लोक फक्त श्रीमंतच नसतात तर भरपूर खर्च करणारे देखील असतात. गरजूंना मदत करणे आणि कुटुंब आणि मित्रांवर पैसे खर्च करणे ही सामान्य सवयी आहेत. असे लोक विलासी आणि आनंदी जीवन जगतात.
सामुद्रिक शास्त्रानुसार आपल्या शरीरावरील तिळामुळे भविष्याबद्दल आणि स्वभावाबद्दल अनेक गोष्टी समजतात. ज्या लोकांच्या वरच्या ओठाच्या उजव्या बाजूला तीळ असतो असे लोक आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे, बोलण्यात गोड आणि आयुष्यात सुख-संपत्ती मिळवणारे मानले जातात.
ज्योतिषशास्त्रानुसार वरच्या ओठावर तीळ असलेले लोक आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे, बोलण्यात प्रभावी आणि समाजात मान-सन्मान मिळवणारे असतात. असे लोक सहजपणे इतरांना प्रभावित करतात आणि त्यांच्या शब्दांना महत्त्व दिले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: होय, समुद्रिक शास्त्रानुसार वरच्या ओठावरील तीळ बहुतेक वेळा शुभ मानला जातो. तो सुख, समृद्धी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे संकेत देतो.
Ans: असे लोक बोलण्यात गोड, समाजप्रिय, आत्मविश्वासू आणि इतरांना सहज प्रभावित करणारे असतात.
Ans: कधी कधी हे लोक जास्त भावनिक, खर्चिक किंवा सुखसोयींवर अधिक अवलंबून असू शकतात.






