फोटो सौजन्य- pinterest
दर महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते. शनिवारी येणाऱ्या व्रताला शनि प्रदोष व्रत असे म्हटले जाते. या दिवशी महादेवांची पूजा केली जाते. सर्व त्रासांपासून सुटका होईल आणि नशिबाची साथ देखील मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवामुळे होणारे सर्व दुःख दूर होते. व्रत केल्याने अकाली मृत्युचे भय दूर होते आणि दीर्घायुष्य, आरोग्य, आनंद आणि समृद्धी मिळते. शनि प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त, महत्त्व आणि मंत्र जाणून घ्या
शनि प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त शनिवार, 4 ऑक्टोबर रोजी सकाळी संध्याकाळी 5.8 वाजल्यापासून सुरु होणार आहे. त्रयोदशी तिथीची समाप्ती रविवार, 5 ऑक्टोबर दुपारी 3:03 पर्यंत वाजेपर्यंत राहील. या दिवशी द्विपुष्कर योग तयार असल्याने महत्त्वाचे आहे. या काळात शिवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. द्विपुष्कर योगामध्ये पूजा करण्यासाठी मुहूर्त सकाळी 6.17 ते 9.9 वाजेपर्यंत आहे. प्रदोष काळात संध्याकाळची पूजा करणे सर्वोत्तम मानली जाते. प्रदोष व्रताची पूजा करण्यासाठी मुहूर्त संध्याकाळी 6.24 ते रात्री 8.49 पर्यंत राहील. पूजेसाठी एकूण कालावधी 2 तास 25 मिनिटे राहील.
शनि प्रदोष व्रताची पूजा करण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून ध्यान करावे. सकाळी शुभ मुहूर्तावर जवळच्या जाऊन प्रार्थना करावी. त्यानंतर शनि देवाची पूजा करावी. त्यानंतर शिवलिंगावर गंगाजलाने स्नान घालावे. गंगाजलाने स्नान घालून झाल्यानंतर बेलाची पाने, धतुरा, आक फुले, दूध आणि मध यांचा अभिषेक करावा. त्यानंतर महादेवाची पूजा करावी. पूजेनंतर, शिव चालिसेचे पठण करावे. तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाणार आहे. प्रदोष काळामध्ये पूजा करताना स्वच्छ कपडे परिधान करावे.
शनि प्रदोष व्रत हे महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी हे व्रत करणे खूप शुभ मानले जाते. शनि प्रदोष व्रत पाळल्याने शनि दोष आणि साडेसातीचे परिणाम दूर होण्यास मदत होते. हे व्रत पाळल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आर्थिक समृद्धी येते. असेही मानले जाते की, शनि प्रदोष व्रताचे व्रत पाळल्याने शनि देव आणि महादेव प्रसन्न होतात. यामुळे भक्ताला दीर्घायुष्य, आनंद आणि समृद्धी प्रदान करतात. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने मागील जन्मातील पापांचे क्षालन होण्यास मदत होते आणि पूर्वजांच्या पापांना शांती मिळते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)