फोटो सौजन्य- pinterest
नवीन वर्ष हे ग्रह आणि नक्षत्रांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे मानले जाते. नवीन वर्षात 15 जानेवारी रोजी दोन अशुभ ग्रह, शनि आणि ग्रह, एकत्रित येऊन दृष्टी राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा एक शुभ ग्रह मानला जातो जो आराम, विलासिता, कला आणि प्रेमाचे प्रतिनिधित्व करतो. तर शनि हा एक अशुभ ग्रह मानला जातो जो न्याय, संघर्ष आणि कर्माचे प्रतिनिधित्व करतो. ज्योतिषशास्त्रात शनि आणि शुक्र हे मित्र ग्रह मानले जातात आणि 15 जानेवारी रोजी शुक्र आणि शनि दोघेही एकमेकांपासून 90 अंशांवर असतील, ज्यामुळे लाभ दृष्टी योग तयार होणार आहे. ज्यावेळी गुरु, शुक्र, बुध किंवा चंद्र यांसारखे शुभ ग्रह या घरावर अनुकूल दृष्टी राहील. नवीन वर्षात या योगाचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
शनि आणि शुक्र यांच्या राजयोगामुळे मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. अडकलेली सर्व कामे सहज पूर्ण होतील. या काळात तुमची अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल. पगारवाढ होऊ शकते. व्यावसायिकांना चांगला फायदा होईल. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळू शकतात. विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षेत शुभ निकाल मिळतील आणि त्यांच्या कुटुंबाचे नावही गौरविले जाईल.
शनि आणि शुक्र यांच्या राजयोगाचा कर्क राशीच्या लोकांना अपेक्षित फायदा होईल. जीवनामध्ये काही चांगल्या संधी मिळतील. जोडीदारासोबतचे नातेसंबंध चांगले राहतील. शुक्र ग्रह परदेशात यशस्वी संधी मिळतील. परदेशाशी संबंधित समस्या सोडवल्या जातील. आर्थिक स्थिती चांगली राहील. या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. कुटुंबाचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा राजयोग फायदेशीर राहणार आहे. या काळात तुमच्यातील समज वाढेल. जीवनामध्ये सकारात्मक बदल होतील. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. या काळात कुटुंबाचे तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि लक्षणीय आर्थिक लाभ मिळेल. जर नवीन व्यवसायाची सुरुवात करणार असाल तर शनि देवाचा तुमच्यावर आशीर्वाद राहणार आहे.
शनि आणि शुक्र यांच्या राजयोगामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना नशिबाची अपेक्षित साथ मिळेल. शुक्रामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना सर्व सुखसोयी आणि विलासिता मिळतील. तुम्ही धार्मिक कार्यावर पैसे खर्च करु शकता. जर तुम्ही दीर्घकाळापासून वादात किंवा कायदेशीर प्रकरणात अडकले असाल तर त्यातून तुमची सुटका होईल. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप मेहनतीचा असणार आहे. या काळात करिअरमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असल्यास तुम्हाला नवीन वर्षात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. खर्चावर नियंत्रण राहील. कुटुंबामध्ये शांती आणि आनंदाचे वातावरण राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: 2026 मध्ये शुक्र आणि शनी ग्रह एकत्र येऊन एक विशेष राजयोग निर्माण करतील. शुक्र हा सुख, ऐश्वर्य, प्रेम आणि वैभवाचा कारक आहे, तर शनी कर्म, शिस्त आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. या दोघांची युती मेहनतीला मोठे यश देणारी मानली जाते
Ans: 2026 मध्ये विशिष्ट कालावधीत शुक्र आणि शनी एकाच राशीत किंवा परस्पर अनुकूल स्थानात असतील, तेव्हा हा राजयोग तयार होईल.
Ans: मिथुन राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये मोठी प्रगती, नवीन संधी, आर्थिक लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याचे योग तयार होत आहेत.






