फोटो सौजन्य- istock
होळीच्या सात दिवसानंतर शीतला सप्तमीचे व्रत पाळले जाते. या दिवशी देवी शीतलाची पूजा केली जाते. शितला सप्तमीला बसोडा असेही म्हणतात. हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची सप्तमी तिथी शीतला सप्तमीला साजरी केली जाते. यंदा शीतला सप्तमी शुक्रवार, 21 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. सनातन धर्मात माता शीतला ही सर्व इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून पूजली जाते. या दिवशी माता शितलाला शिळे अन्न अर्पण केले जाते. शीतला माता शीतलता देणारी देवी आहे असे म्हटले जाते. त्यांची पूजा केल्याने आरोग्याचे वरदानही मिळू शकते, असे सांगितले जाते.
शीतला सप्तमी तिथीची सुरुवात सकाळी 2.45 मिनिटांनी होईल आणि तिथीची समाप्ती शनिवार, 22 मार्चला सकाळी 4.23 मिनिटांनी होईल. उद्यतिथीनुसार, हे व्रत शुक्रवार 21 मार्च रोजी पाळले जाणार आहे.
शीतला सप्तमी पूजा मुहूर्त- शुक्रवार 21 मार्च रोजी सकाळी 6.24 पासून ते 6.23 मिनिटांपर्यंत असेल. तसेच शीतला सप्तमीच्या दिवशीही रवि योग जुळून येतो. या योगात देवी शीतलाची पूजा केल्याने निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मिळतो.
शीतला सप्तमीच्या दिवशी सकाळी सूर्योद्यापूर्वी उठून थंड पाण्याने आंघोळ करावी. शीतला सप्तमीच्या दिवशी देवी शीतलाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्रताचा संकल्प करा. त्यानंतर शीतला देवीच्या देवळात जाऊन तिला शुद्ध पाणी अर्पण करा. देवीची विधिवत पूजा करा. त्यानंतर देवीला शिळे अन्न अर्पण करावे. देवी शीतलाला गूळ आणि गोड तांदूळापासून बनवलेले पदार्थ खूप आवडतात त्यामुळे तुम्हीही या वस्तू अर्पण करु शकता. यानंतर देवीला लाल रंगाची फुले अर्पण करा.
शीतला मातेला अर्पण करण्यासाठी आदल्या रात्री हरभरा डाळ पाण्यात भिजवावी. लक्षात ठेवा की, देवीला नेहमी थंड पदार्थांचा प्रसाद अर्पण केला जातो म्हणून आदल्या दिवशी प्रसाद तयार ठेवा. पूजा झाल्यानंतर शीतला देवीची कथा नक्की वाचावी. घरी परतल्यावर मुख्य दरवाजावर पाच वेळा हळदीने हात लावा.
दिवशी उपवास केल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांना चेचक, ताप आणि डोळ्यांशी संबंधित आजारांपासून आराम मिळतो. विशेषत: लोक विविध रोगांपासून मुक्त होण्यासाठी या दिवशी उपवास करतात. मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी पालक या दिवशी शीतला मातेचे व्रत करतात. यासोबतच विवाहित महिलांनी आजचे व्रत करून शीतला मातेकडून अखंड सौभाग्याचे आशीर्वाद मिळवू शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)