फोटो सौजन्य- pinterest
पंचांगानुसार, शनिवार, 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून शुक्र आणि शनि एक अतिशय शक्तिशाली दुर्मिळ आणि शुभ योग तयार करत आहेत. हा एक कोनीय संयोग आहे ज्याला “त्रिदशंक योग” म्हणतात. जेव्हा दोन ग्रहांमध्ये 108° चा कोन तयार होतो तेव्हा हा संयोग होतो. पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात या योगाला त्रिदेशीय आस्पेक्ट म्हणतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र आणि शनिच्या या त्रिदशंक संयोगामुळे मानसिक संतुलन आणि सकारात्मक विचारसरणी वाढते. म्हणूनच व्यक्तीचे प्रयत्न लवकर यशस्वी होतात आणि संपत्ती वाढते. जरी या योगाचा विशिष्ट राशींवर व्यापक प्रभाव पडेल,हा योग काही राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. त्यांना प्रत्येक प्रयत्नात यश मिळू शकते, तसेच आर्थिक लाभही मिळू शकतो. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या
या काळात वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. विशेषतः जर ते कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घेत असतील तर ते फायदेशीर ठरू शकतात. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला स्थिरता आणि आर्थिक बळकटी देखील अनुभवता येईल. व्यावसायिकांसाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात आणि जुन्या व्यवहारांमधून नफा मिळू शकतो. कुटुंबामध्ये शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. याकाळात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. यावेळी मानसिक स्पष्टता आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढू शकते. अभ्यास करणारे, लिहिणारे किंवा सर्जनशील काम करणाऱ्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. जर प्रवासाची किंवा ठिकाण बदलण्याची योजना करत असल्यास हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर आहे. नातेसंबंधांमध्ये परस्पर समजूतदारपणा वाढेल आणि जुने मतभेद दूर होऊ शकतात. नवीन गुंतवणुकीच्या संधी मिळतील. आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि नवीन कौशल्ये शिकण्यासाठी देखील हा काळ अनुकूल असेल.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. करिअर, प्रतिष्ठा किंवा सामाजिक मान्यता वाढण्यासाठी हा काळ चांगला राहील. तुम्ही बऱ्याच काळापासून करत असलेल्या कष्टाचे फळ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, किंवा जुन्या प्रयत्नांना यश मिळू शकते. जे व्यावसायिक भागीदारी आणि टीमवर्कमुळे यश मिळू शकते. तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणे फायदेशीर ठरेल. या काळात प्रवास करणे आणि नवीन प्रकल्प सुरू करणे फायदेशीर ठरु शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: ज्यावेळी शुक्र आणि शनि एकाच राशीत किंवा विशेष दृष्टीयोगात येतात तेव्हा अत्यंत प्रभावी त्रिदशंक योग तयार होतो
Ans: शुक्र ऐश्वर्य आणि सुख देतो, शनि परिश्रमाचे फल देतो दोन्ही ग्रहांची ऊर्जा मिळून स्थिर आणि दीर्घकालीन लाभ होतात
Ans: वृषभ, कर्क आणि कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे






