फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याचे संक्रमण आणि नक्षत्र परिवर्तनाचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. सूर्य हा एक महिन्याने आपली राशी आणि नक्षत्र बदलत राहतो. याला ज्योतिषशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे. सूर्याने 27 सप्टेंबर रोजी सकाळी उत्तराफाल्गुनी नक्षत्रापासून दूर गेला आणि हस्त नक्षत्रात प्रवेश केला आहे. हा बदल काही राशीच्या जीवनात सकारात्मक बदल घेऊन येणारा असणार आहे.
सूर्याला ग्रहांचा राजा, ऊर्जा, आत्मविश्वास, नेतृत्व आणि जीवनाच्या मूलभूत घटकांचा कर्ता मानले जाते. ज्यावेळी सूर्य हस्त नक्षत्रामध्ये संक्रमण करतो. ज्याचा परिणाम कुंडलीमध्ये हस्त नक्षत्र आहे त्यांच्या जीवनावर होतो. या काळात सूर्य 10 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत हस्त नक्षत्रात राहील त्याचा परिणाम काही राशीच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर राहणार आहे. आर्थिक आणि कामामध्ये कोणत्या राशीच्या लोकांना अपेक्षित यश मिळणार आहे, जाणून घ्या
सूर्याने हस्त नक्षत्रात प्रवेश केल्याने वृषभ राशीच्या लोकांना त्याचा जास्त फायदा होणार आहे. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय सहज साध्य करू शकाल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. ज्यामुळे आर्थिक लाभ आणि चांगली बातमी मिळेल. या काळात करिअर आणि आरोग्यामध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम जाणवतील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्याने हस्त नक्षत्रात प्रवेश केल्याने हा काळ खूप शुभ राहणार आहे. व्यवसायात तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. या राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती होऊ शकते. मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल. आर्थिक लाभ आणि उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील.
हस्त नक्षत्रातील सूर्याचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमची करिअरमध्ये प्रगती होईल. ज्यांचे काम काही कारणास्तव थांबले आहेत त्यांना अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल.
धनु राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हस्त नक्षत्रातील संक्रमण शुभ राहील. यामुळे तुम्हाला अनेक लाभ होऊ शकतात. तसेच तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्यासोबतच तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. जे लोक नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात आहात त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल राहील. सामाजिक आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. ज्यामुळे तुम्ही प्रत्येक आव्हानाला सहजतेने तोंड देऊ शकाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)