फोटो सौजन्य: गुगल
महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हटलं की पहिले आठवतं ते खंडोबा आणि तुळजा भवानी. पिढ्यानपिढ्या अनेक कुळांच हे कुलदैवत आहे. याच प्रमाणे कोळी बांधवांच्या हाकेला धावून येणारी देवी म्हणजे आई एकवीरा. कोळी बांधव मासेमारीसाठी जीवावर उदार होऊन खोल समुद्रात जातात. त्यांच्या या मेहनतीमागे आई एकविरेचा कृपाशिर्वाद सदैव पाठीशी असतो. या कोळ्यांच्या माऊलीचा उत्सव म्हणजे चैत्र महिन्यातील आई एकविरेचा पालखी सोहळा. चैत्र महिना म्हणजे गुढीपाडवाच्या आणि चैत्र नवरात्रीचा उत्सव असतो त्याचप्रमाणे कार्ले डोंगरावर म्हणजेच एकविरा आईच्या निवासस्थानी तिचा पालखी सोहळा असतो. या पालखीसोहळ्यासाठी कोळी बांधव मोठ्या संख्येने आणि भक्तीभावाने कार्ले डोंगराला येतात.
कार्ले डोंगराला देवी एकविरा आईचं निवासस्थान म्हटलं जातं. पाच पांडवांनी देवीच्या मंदिराची स्थापना केली अशी दंतकथा सांगितली जाते. पुराणानुसार, पांडवांनी वनवासात असाताना एकविरा देवीचे मंदिर बांधले होते. महाभारतातील कथेनुसार, महाभारतातील वनवासाच्या काळात पांडवांनी एकविरा देवीचे मंदिर बांधले. वनवासात भ्रमंती करत असतावा पांडव लोणावळ्याजवळ आले. तेव्हा देवीने त्यांच्यासमोर प्रकट होऊन एका दिवसात मंदिर बांधण्याची आज्ञा दिली, आणि पांडवांनी ती आज्ञा पूर्ण केली. त्यानंतर आई एकविरा पांडवांवर प्रसन्न झाली. वनवास काळात पांडव या भागात आले होते. त्यांनी एकविरा देवीची आराधना केली होती आणि तिच्या कृपेनेच त्यांनी अनेक संकटांवर मात केली. असेही मानले जाते की भीमाने येथे वास्तुशास्त्र आणि शिल्पकलेचे ज्ञान मिळवले होते.महाभारतातील कौरव आणि पांडव यांच्यातील संघर्षानंतर, पांडवांना 13 वर्षांचा वनवास भोगावा लागला. या काळात त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमंती केली. वनवासाच्या दरम्यानच त्यांनी एकविरा देवीची उपासना केल्याचा उल्लेख काही लोककथांमध्ये आढळतो.
महाभारतातील कथेनुसार, पांडव जेव्हा सह्याद्री पर्वत आणि कोकण परिसरात प्रवास करत होते, तेव्हा त्यांनी कार्ले लेण्याजवळ मुक्काम केला. तेव्हा या ठिकाणी एकविरा देवीच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली होती. पांडवांनी देवीची भक्ती केली आणि तिच्या कृपेने त्यांना पुढील कठीण प्रसंगांवर मात करता आली.
भीमाने येथे वास्तुशास्त्र आणि शिल्पकलेचे ज्ञान मिळवले, त्यामुळेच त्याने मयासुराच्या मदतीने इंद्रप्रस्थातील भव्य सभागृह उभारले, अशी ही दंतकथा काही ठिकाणी सांगितली जाते. .पाच पांडव आणि एकविरा देवी यांच्यातील संबंध लोककथांमध्ये दृढ आहे. वनवास काळात त्यांनी देवीची आराधना केली आणि तिच्या आशीर्वादाने अनेक संकटांवर विजय मिळवला. आजही एकविरा देवी कोळी समाजाची प्रमुख देवता आहे. महाभारत – वनपर्व (पांडवांच्या वनवासातील प्रवास आणि वेगवेगळ्या देवींची आराधना) या ग्रंथात एकवीरा देवीच्या मंदिराबाबतचा उल्लेख आढळतो.