(फोटो सौजन्य – Pinterest)
Christmas 2025 : ड्रेसेस, मेकअप, फूटवेअर आणि ज्वेलरीसह यंदाच्या ख्रिसमस पार्टीला करा एलिगंट लूक
मेहंदीपूर बालाजी मंदिर, राजस्थान
राजस्थानमध्ये असलेले हनुमानजींचे मेहंदीपूर बालाजी मंदिर नकारात्मक शक्ती आणि बाधांपासून मुक्ती देणारे मानले जाते. येथे बालाजींना बूंदीचे लाडू, तर भैरव बाबांना उडीद डाळ आणि भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो.
स्थानिक श्रद्धेनुसार, या मंदिरातील प्रसाद खाणे किंवा घरी नेणे अशुभ मानले जाते. असे केल्यास नकारात्मक शक्ती आपला पाठलाग करतात, अशी भाविकांची ठाम धारणा आहे. त्यामुळे येथे प्रसाद फक्त देवाला अर्पण केला जातो.
माँ कामाख्या देवी मंदिर, आसाम
गुवाहाटी येथे स्थित माँ कामाख्या देवी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आहे. देवीच्या रजस्वला काळात (अंबुबाची योग) सलग तीन दिवस मंदिर बंद ठेवले जाते. या काळात भाविकांना मंदिरात प्रवेश तसेच प्रसाद घेण्याची परवानगी नसते. मान्यतेनुसार, या दिवसांत देवी विश्रांती घेतात, त्यामुळे प्रसाद ग्रहण करणे वर्ज्य मानले जाते.
उज्जैन काल भैरव मंदिर, मध्य प्रदेश
मध्य प्रदेशातील उज्जैन येथील काल भैरव मंदिरात भैरव बाबांना मद्याचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. भारतातील हे एकमेव असे मंदिर आहे जिथे ही प्रथा आजही सुरू आहे. श्रद्धेनुसार, हे मद्य फक्त देवासाठी असते. भाविकांनी ते ग्रहण करू नये, असा कडक नियम आहे. हा नियम मोडल्यास आयुष्यात अडचणी आणि संकटे येतात, असे मानले जाते.
नैना देवी मंदिर, हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशातील नैना देवी मंदिर हेही एक शक्तिपीठ आहे. येथे देवीला फळे, फुले आणि मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो. मान्यतेनुसार, या मंदिरातील प्रसाद मंदिर परिसरातच ग्रहण करावा. तो घरी नेणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे भाविक मंदिरातच प्रसाद स्वीकारतात.
2026 मध्ये कधी कधी आहेत लाँग वीकेंड? हॉलिडे लिस्ट पहा आणि ट्रॅव्हल प्लॅन बनवा
कोलार कोटिलिंगेश्वर मंदिर, कर्नाटक
कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील कोटिलिंगेश्वर मंदिर हे असंख्य शिवलिंगांसाठी प्रसिद्ध आहे. येथे शिवलिंगांची संख्या शेकडो-हजारो नसून तब्बल एक कोटी असल्याचे मानले जाते.
या मंदिरात पूजेनंतर मिळणारा प्रसाद केवळ प्रतीकात्मक स्वरूपात स्वीकारला जातो. तो खाणे किंवा घरी नेणे मनाई आहे. विशेषतः शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद अजिबात ग्रहण करू नये, कारण तो चंडेश्वराला समर्पित असतो, अशी श्रद्धा आहे. ही सर्व मंदिरे आपापल्या श्रद्धा, नियम आणि परंपरांसाठी ओळखली जातात. त्यामुळे अशा ठिकाणी दर्शनाला जाताना तेथील नियमांचे पालन करणे, हीच खरी भक्ती मानली जाते.






