फोटो सौजन्य- istock
प्रत्येकाच्या जीवनाचा चढ उतार चालूच असतो. यावेळी वेळ माणसाला केवळ बलवानच बनवत नाही तर आयुष्यातील चांगल्या काळाचे मूल्य अनेक पटींनी वाढवते. प्रत्येकाला जीवनामध्ये पैसा, नोकरी, परिवार यांच्यातील होणारे मतभेद यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे हळूहळू ताण सुद्धा वाढतो. याला अन्य गोष्टी सुद्धा कारणीभूत ठरू शकतात. व्यक्तीच्या जीवनात एखादी चांगली घटना घडणार असल्यास तसे त्याला संकेत देखील मिळतात. हे संकेत शुभ अशुभ घटनांचे प्रतिनिधित्व करते. चांगले दिवस येण्यापूर्वी व्यक्तीला कोणते संकेत मिळतात ते जाणून घ्या.
असे मानले जाते की सकाळी उठल्याबरोबर शंख वाजल्याचा आवाज येणे शुभ संकेत आहे. हा आवाज सकाळी कानावर पडल्याने चांगले तर वाटतेच पण चांगले दिवस सुरू होण्यापूर्वीचे हे संकेत मानले जाते.
हिंदू धर्मामध्ये झाडूला संपत्तीची देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. यामुळे झाडू घरात ठेवण्यासाठी काही नियम देखील धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले गेले आहेत. जर तुम्ही कोणत्याही कामानिमित्त बाहेर जाताना तुम्हाला एखादा व्यक्ती झाडू मारताना दिसणे हे फायदेशीर मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता प्रवेश करत आहे.
जर तुम्हाला घरातून निघाल्या बरोबर घराबाहेर पांढऱ्या रंगाची गाय दिसणे हे एक शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ असा होतो की, तुमच्या जीवनात आनंद येणार आहे आणि दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत. याशिवाय तुम्ही गाईला रोज चपाती खायला देखील देऊ शकता. असे मानले जाते की, गाई मध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे गाईला चपाती खायला दिल्याने तुमच्यावर असलेले सगळे संकट, दुःख दूर होतात, अशी मान्यता आहे.
जेव्हा तुम्हाला सकाळी ब्रम्ह मुहू्र्तावर आपोआप जाग येते, तेव्हा समजून जावे की, हे चांगले दिवस सुरु होण्याचे संकेत आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला शांत आणि आनंदी देखील वाटू शकते.
जर तुम्हाला घरामध्ये वारंवार काळ्या मुंग्या दिसत असल्यास तुमच्या जीवनातील सर्व समस्या संपून चांगले दिवस सुरु होण्याचे हे संकेत असू शकतात. यामुळे तुम्हाला करिअरमध्येही यश मिळणार आहे, असे देखील संकेत असू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)