फोटो सौजन्य- pinteres
वटपौर्णिमेचे व्रत हे उत्तर महाराष्ट्रात वट सावित्री म्हणून ओळखले जाते. हे व्रत अमावस्येच्या दिवशी पाळले जाते. तर महाराष्ट्रामध्ये हे व्रत वट पौर्णिमा म्हणून पाळले जाते. दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिथीला वट पौर्णिमेचे व्रत पाळले जाते. यंदा वट पौर्णिमेचे व्रत मंगळवार, 10 जून रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. या दिवशी उपवास देखील करतात.
वट पौर्णिमेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त मंगळवार, 10 जून रोजी सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी सुरु होत आहे. तर त्याची समाप्ती बुधवार, 11 जून रोजी दुपारी 1 वाजून 13 मिनिटांनी होईल.
तसेच या दिवशी सकाळी लवकर उठून वडाची पूजा केली जाते. वडाची पूजा झाल्यानंतर सुवासिनी एकमेंकीना वाण देतात. वाण देण्याची प्रथा फार जूनी आहे. या वाणामध्ये पाच काळ्या मण्यांसह आंबा, जांभूळ, करवंद, फणस, केळ या फळांचा समावेश असतो.
वटपौर्णिमेचे व्रत सत्यवानाला समर्पित मानले जाते. पौराणिक कथेनुसार, सावित्री ही राजा अश्वपतीची कन्या होती आणि ती अत्यंत सुंदर आणि चांगल्या स्वभावाची होती. सावित्रीचा विवाह सत्यवान नावाच्या तरुणाशी झाला होता. सत्यवान हा खूप धार्मिक आणि देवाचा खरा भक्त होता. एकेदिवशी नारदजींनी सावित्रीला सांगितले की सत्यवानाचे आयुष्य खूप कमी आहे. अशा परिस्थितीत सावित्रीने सत्यवानाच्या आयुष्यासाठी कठोर तपश्चर्या केली. पण जेव्हा वेळ आली तेव्हा यमराज सत्यवानाचा जीव घेण्यासाठी आला. मग सावित्रीने तिच्या पतीत्वाच्या बळावर यमराजला थांबवले. यामुळे यमराजांनी सावित्रीला वरदान मागण्यास सांगितले.
त्यावेळी सावित्रीने 3 वेगवेगळे वर मागितले होते, पण शेवटी सावित्रीने पुत्रप्राप्तीचे वरदान मागितले होते आणि यमराजांनी विचार न करता सावित्रीला हे वरदान दिले, पण पतीशिवाय पुत्रप्राप्ती शक्य नाही. म्हणून, आपले वचन पूर्ण करण्यासाठी, यमराजाला सावित्रीच्या पती सत्यवानाचे जीवन परत करावे लागले.
Palmistry: महिलांच्या तळहातावरील कोणती रेषा सांगते भविष्य, जाणून घ्या
मम वैद्यव्यादि-सकलदोषपरिहारार्थम् ब्रह्मसावित्रीप्रीत्यर्थम्
सत्यवत्सवित्रीप्रित्यर्थम् च वत्सवित्रीवृत्तम् करिष्ये
अवैधव्यं च सौभाग्यं देहि त्वं मम सुव्रते।
पुत्रान् पौत्रांश्च सौख्यं च गृहाणार्घ्यं नमोऽस्तुते।।
यथा शाखाप्रशाखाभिर्वृद्धोऽसि त्वं महीतले।
तथा पुत्रैश्च पौत्रैश्च सम्पन्नं कुरु मा सदा।।
सावित्री ब्रम्हसावित्री सर्वदा प्रियभाषिणी।
तेन सत्येन मां पाहि दुःख संसार सागरात।
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते।
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि।।
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)