फोटो सौजन्य- pinterest
स्तोत्रामुळे कोणत्याही देवी अथवा देवाचे गुणगान आणि महिमा वर्णन केला जाऊ शकतो. स्तोत्र म्हटल्याने अलौकिक ऊर्जा संचारते, त्या दिव्य शब्दांच्या उच्चाराने आपण त्या देवतेला प्राप्त करू शकतो. स्तोत्र पठण हेच जास्त महत्त्वाचे आहे कारण ते गीतात्मक असते.
मंत्र हे केवळ शब्दांचा समूह असे बऱ्याच जणांना वाटत असते, असे समजणे म्हणजे त्या मंत्रांचा स्वतःसाठी प्रभाव कमी करणे होय, मंत्र तर शक्तिशाली लयबद्ध शब्द तरंग आहेत. हे तरंग भटकत्या मनाला केंद्रस्थानी ठेवतात. शब्दांचे योजनाबद्ध मांडणी ही साधारण मुळीच नसते. यांना ऋषींनी वर्षानुवर्षे साधना केल्यावर लिहिले गेले आहेत. मंत्र जपाने आजूबाजूचे वातावरण शांत आणि भक्तिमय होत असते. जे सकारात्मक ऊर्जा एकत्रिक करून मन शांत करत असते. मन शांत झाल्यावर अर्ध्याहून अधिक समस्या स्वतःहून शांत होतात.
मंत्र हे देवी देवतांच्या आमंत्रणाचे खास मंत्र असतात. वैदिकमंत्रांना एका गुप्त लयबद्ध छंदामध्ये बांधले जाते ज्या काही वैदिक ऋचा आहेत त्यांनाही मंत्र असे म्हणतात हे नित्य जप केल्याने चैतन्य निर्माण होते. मंत्र हे सतत जपले पाहिजेत, निरंतर जप केला पाहिजे.
मंत्र एक विशेष लयात असतात जे गुरुच्या माध्यमातून प्राप्त केले जाऊ शकतात. जे आपल्या अंतर्मनात समाविष्ट होऊन आत्मीय समाधान करतात ते म्हणजे मंत्र, ब्रह्माण्ड उत्पत्ती झाली, त्याबरोबर ओमकाराची उत्पत्ती झाली. याचे वर्णन आणि महिमा साक्षात भगवान शंकर यांनी केले आहे, यामध्ये सर्व नाद समाविष्ट आहेत. मंत्र आपल्या इष्टदेवतेला स्मरण करणे आणि त्यांच्याप्रति समर्पित होणे होय. मंत्र व स्तोत्र यात असे अंतर आहे की, स्तोत्र गायले जाऊ शकते परंतु मंत्र हे एक पूर्व निश्चित लयात जप करावे लागतात .
देवी देवत्यांच्या मूळ मंत्राला बीज मंत्र म्हणतात. सर्व देवी देवतांचे बीज मंत्र आहेत. समस्त वैदिक मंत्रांचे सार म्हणजे बीज मंत्र होय. हिंदू धर्मानुसार सर्वात प्रधान बीज मंत्र “ॐ” मानले आहे. “ॐ” हे अन्य मंत्रांसोबत वापरले जाते, कारण हे सर्व मंत्रांना प्रेरणा व शक्ती देते. बीज मंत्रांनी देव लवकर प्रसन्न होतात. जीवनात आर्थिक, सामाजिक अथवा शारीरिक या सर्व समस्या बीज मंत्र जप केल्याने संपुष्टात येतात.
मंत्र असो वा स्तोत्र, यांच्या जपाने देवी देवतांची विशेष कृपा होते. शास्त्रांमध्ये ही मंत्रांचे वर्णन विस्तृत स्वरूपात केले आहे. या सृष्टीत असे काही नाही की, ते मंत्रजपाने मिळत नाही. हे आवश्यक आहे की साधकाद्वारा केलेला जपविधी हा जगाचे कल्याण करण्याच्या भावनेने केलेला असावा. बीज मंत्र जपाने विशेष फायदे होतात. बीजमंत्रांचा जप करत असताना त्याचा प्रभाव अधिकाधिक वाढत असतो. वैज्ञानिक स्तरावर ही याच्यावर संशोधन झाले आहे. मेंदूचे विशेष भाग सक्रिय होतात. मंत्र जप एवढे प्रभावशाली आहेत की त्याने नशिबाच्या रेषा ही बदलल्या जातात. जर बीज मंत्र समजून घेऊन गुरूआज्ञेनुसार निष्ठेने जप केल्यास असाध्य ते साध्य करता येते मग त्या समस्या असो वा आजार. विशेष तज्ज्ञ वा गुरु यांच्या सल्ल्याने बीजमंत्र जप केल्यास अधिक लाभ होतात.
मंत्र हा शब्द दोन अक्षरांनी मिळून बनला आहे. मन+त्र. याचा शाब्दिक अर्थ म्हणजे मनातील वाईट विचार काढून त्याजागी नव्या विचारांना रुजवणे. जेव्हा मनात ईश्वरसंबंधी विचार उदयास येतात तेव्हा रोग आणि नकारात्मकता दूर जाऊ लागते. वेदांचे प्रत्येक श्लोक हे एक मंत्र आहेत. बीजमंत्रांच्या जपाने निर्माण झालेले तरंग संपूर्ण वायूमंडलात व्याप्त होऊन सुप्त शक्ती जागृत करून लाभ प्राप्त करून देते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: स्तोत्र: देवतेची स्तुती करणारे श्लोक किंवा काव्यरचना (भक्तीप्रधान). मंत्र: विशिष्ट ध्वनी/अक्षरांचा पवित्र जप, ज्याला आध्यात्मिक शक्ती मानली जाते.
Ans: योग्य उच्चार आणि लय, एकाग्रता आणि शुद्ध मन, नियमितता (दररोज जप)
Ans: मानसिक शांती मिळते, तणाव कमी होतो, सकारात्मक ऊर्जा वाढते, आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढते






