कडक सुरक्षेतही Trump वर हल्ला! भर कार्यक्रमात बंदुकीसह नेमका कसा पोहोचला हल्लेखोर? जाणून घ्या इनसाइड स्टोरी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, डिनरवेळी एका अज्ञात हल्लेखोराने हॉटेलच्या मुख्य दरवाजाजवळील सुरक्षा यंत्रणेकडे धाव घेत घुसखोरी केली. यावेळी एका सुरक्षा रक्षकाने त्याला तातडीने रोखले. पण हल्लेखोराने सीक्रेट सर्व्हिसच्या एका अधिकाऱ्यावर गोळीबार केला. सुदैवाने अधिकाऱ्याने बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते, यामुळे तो बचावला. यानंतर रक्षकांनी सेकंदात हल्लेखोराला जमिनीवर पाडत अटक केली. ट्रम्प यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनाही तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
या घटनेनंतचर सुरक्षा यंत्रणांना तपास सुरु केला होता. तपासातून हल्लेखोराची ओळख ३१ वर्षीय कोल थॉमस ॲलन अशी पटवण्यात आली. ॲलन मूळचा कॅलिफोर्नियाचा रहिवासी असून व्यवसायाने इंजिनिअर आहे.
गेस्ट बनून आला होता हल्लेखोर ॲलन
तपासात असेही आढळून आले की, हल्लेखोर ॲलन कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच हॉटेलमध्ये दाखल झाला होता. ॲलन हॉटेलमधील एका खोलीत लपून बसला होता. त्याने हॉटेलमध्ये आधीच मुक्काम ठोकल्यामुळे बाहेरील कडक सुरक्षा तपासणीतून बंदूक नेणे ॲलनला शक्य झाले असावे असा पोलिसांनी म्हटले आहे.
हल्लेखोर ॲलन मुख्य बॉलरुमच्या अवघ्या ५० फूट अंतरावर पोहोचल होता. त्याने आत शिरण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला वेळीच रोखण्यात आले. यामुळे ट्रम्प यांचे प्राण बचावले. सध्या या कटात त्याला कोणाचा पाठिंबा मिळाला आहे, या हल्ल्यामागे कोणती संघटना आहे, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान ट्रम्प यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, मला सुरुवातीला एखादा ट्रे पडल्यासारखा आवाज आला, पण परिस्थिती गंभीर होती. मात्र सीक्रेट सर्व्हिसच्या रक्षकांच्या तातडीच्या आणि धाडसाच्या कारवाईमुळे माझा जीव वाचला, हे कौतुकास्पद आहे.
परंतु कडक सुरक्षा असतानाही हल्लेखोराची घुसखोरी ही अमेरिकेच्या (America) सुरक्षा यंत्रणेतील मोठी त्रुटी मानली जात आहे. पण यामुळे यापूर्वीही अनेकवेळा ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचे प्रयत्न झाले आहेत.
Ans: प्राथमिक तपासानुसार, हल्लेखोर कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच हिल्टन हॉटेलमध्ये गेस्ट बनून आला असावा. यामुळे सुरक्षा तपासणीतून सुटका मिळत सहजपणे त्याला शस्त्र आता नेता आली.
Ans: ट्रम्प यांच्यावर एका कार्यक्रमात गोळीबार करण्यात आला असून संशियाताचे नाव कोल थॉमस ॲलन असे त्याची ओळख पटवण्यात आली आहे. ३१ वर्षीय ॲलन हा मूळचा कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे. ॲलन व्यवसायाने इंजिनियर आहे.






