काय घडलं नेमकं?
पंकज दादाराव वाघमारे हे विडा येथील रहिवासी आहे. ते गुरुवारी सकाळच्या सुमारास शिंदी फाट्याजवळील एका दुकानासमोर बसले होते. त्याचवेळी आरोपी दीपक उत्तम वाघमारे आणि त्याचा साथीदार प्रेम हे दोघे पाठीमागून येत त्यांनी पंकज यांना भेटले. या दरम्यान दोघांनीही पंकज यांच्याशी वाद घालत त्यांच्या पत्नीसोबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. ‘ती आता तुझी नसून माझी आहे’ असे म्हणत त्यांनी पंकज यांच्यावर हल्ला चढवला.
Crime News : चारित्र्यावरुन संशय अन् मारहाण; वडगाव मावळमध्ये जोडीदारानेच घेतला पत्नीचा जीव
आरोपींनी लोखंडी रॉडने त्यांच्या पायावर आणि मांडीवर वार केले, तसेच डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. एवढेच नाही तर पुन्हा पत्नीला फोन केल्यास जीवे मारण्याची धमकी पंकज याना दिली. या घटनेमुळे जखमी अवस्थेत पंकज यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. पोलीस या घटनेचा तपास करत असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
‘मुलीचं लग्न माझ्याशी लावा’ नाही तर…, गुन्हा दाखल; बीडमध्ये धक्कादायक प्रकार
बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने जबरदस्ती घरात घुसून तुमच्या मुलीचं लग्न माझ्यासोबत लाऊन द्या, अन्यथा तिच्या वडिलांना जीव ठार मारेन, अशी धमकी दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बीडच्या केज तालुक्यातील एका खेडेगावात घडली.
काय घडलं नेमकं?
एका तरुणाने सायंकाळी घराच्या पाठीमागून प्रवेश करून मायलेकींना धमकी दिली. आरोपी तरुणाने छतावरून उडी मारून घरात प्रवेश केला. “तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून द्या, नाहीतर तिच्या वडिलांना जीवे मारील, अशी धमकी त्याने दिली. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकच तपास केला जात आहे.
Solapur Crime: विजेचा धक्का की घातपात? विवाहित महिलेचा मृत्यू; शिक्षक पतीवर गुन्हा दाखल
Ans: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शिंदी फाटा परिसरात.
Ans: पतीने पत्नीला फोन केल्याच्या कारणावरून वाद झाला.
Ans: तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






