Iran Pakistan Relations : पाकिस्तानचा मोठा अपमान! इराणी खासदाराने PM शाहबाज आणि फील्ड मार्शल मुनीरला फटकारले, (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणचे जेष्ठ खासदार आणि राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रवक्ते इब्राहिम रेजाई यांनी पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पाकिस्तान (Pakistan) इराणचा मित्र देश असला तर आंतरराष्ट्रीय वादात मध्यस्थी करण्यास आणि निष्पक्ष राहण्यास तो पात्र नाही, अशा शब्दात रेजाई यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. रेजाई यांनी पाकिस्तानच्या धोरणांवर तीव्र टीका केली आहे.
त्यांच्या मते, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर (Asim Munir) अमेरिकेच्या तालावर नाचत आहे. अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानने कधीही स्वतंत्रपणे आणि ठामपणे आपली भूमिका मांडलेली नाही. यापूर्वी अमेरिकेने देखील पाकिस्तानचे अनेक प्रस्ताव कचऱ्यात टाकले आहेत. अशा परिस्थिती, जो देश स्वतच्या प्रस्तावाचे रक्षण करु शकत नाही तो इतरांसाठी काय मध्यस्थी करणार असा प्रश्न रेजाई यांनी केला आहे.तसेच लेबनॉन आणि इराण(Iran) च्या जप्त केलेल्या संपत्तीबाबत अमेरिकेने दिलेली आश्वासन हवेत विरली आहेत. पाकिस्तानची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे.
एकीकडे इराणने पाकिस्तानला झिडकारत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान युरोपीय देशांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. इराणचे परराष्ट्र अब्बास अराघची यांनी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरोट यांच्याशी संपर्क साधला आहे. या संवादात दोन्ही मंत्र्यांनी प्रादेशिक शांतता आणि युद्धविरामासाठी युरोपीय देशांची भूमिका स्पष्ट केली आहे. इराणच्या या बदलत्या भूमिकेमुळे जागतिक राजकारणात चर्चांणा उधाण आल आहे.
इराणने पाकिस्तानला शेजारी देश म्हणून मान दिला आहे, परंतु जागतिक राजकारणच्या पटावर पाकिस्तान अपात्र असल्याचे स्पष्ट केला आहे. सध्या इराण आपली कूटनीतिक खेळी रशिया आणि युरोपच्या माध्यमातून खेळण्याची तयारी करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Ans: इराणच्या मते, पाकिस्तानची धोरणे स्वतंत्र नसून अमेरिकेच्या हिताने प्रेरित आहे. पाकिस्तान निष्पक्ष मध्यस्थीची भूमिका अविश्वासार्ह आहे, ट्रम्पच्या दबावाखाली पाकिस्तान काम करत आहेत.
Ans: पाकिस्तानच्या मध्यस्थीवर अविश्वासामुळे इराण युरोपीय देशांळी राजमनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच मित्र राष्ट्र रशियाशीही चर्चा सुरु आहे.






