फोटो सौजन्य- pinterest
आपल्या जीवनामध्ये सूर्याला विशेष महत्त्व आहे. सूर्यप्रकाश केवळ आपल्याला ऊर्जाच देत नाही तर आपला संपूर्ण दिवस त्यानुसार आयोजित केला जातो. आपण पाहिलेच आहे की काही दिवस आपल्याला खूप मोठे दिसतात तर काही दिवस खूप लवकर संपतात. या सर्वांचे कारण केवळ हवामान नसून, पृथ्वीचा वेग आणि कल देखील आहे. सर्व दिवसांपैकी सर्वांत मोठा दिवस म्हणून 21 जूनचा दिवस मानला जातो. यावेळी दिवस सर्वांत मोठा असतो तर रात्र लहान असते. 21 जूनला वर्षातील सर्वांत मोठा दिवस का म्हणतात आणि त्याची कारणे जाणून घेऊया.
21 जून या दिवसाला उन्हाळी संक्रांती असे म्हटले जाते. या दिवशी पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे सर्वात जास्त कललेला असतो. म्हणूनच या दिवशी सूर्याची किरणे उत्तर गोलार्धात सरळ किंवा लंब पडतात. त्यामुळे भारतामधील अनेक देशांमध्ये या दिवशी सूर्य सर्वात जास्त काळ आकाशात दिसतो. त्याचा परिणाम म्हणजे या दिवशी दिवस मोठा आणि रात्र लहान होते. म्हणूनच 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो. उन्हाळी संक्रांतीमधील संक्रांतीचा अर्थ असा होतो की, सूर्याचे एका विशिष्ट स्थितीत येणे. ही खगोलीय घटना वर्षातून दोन वेळेस होते. हे दिवस म्हणजे 21 जून या दिवशी दिवस मोठा असतो आणि रात्र लहान असते. दुसरा दिवस म्हणजे 21 डिसेंबर म्हणजे हिवाळी संक्रांती या दिवशी रात्र सर्वांत मोठी असते.
असे म्हटले जाते की, या दोन्ही दिवसामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना कललेल्या स्थितीत असते. पृथ्वी तिच्या अक्षाकडे 23.5 अंशांनी कललेली असते आणि या कलतेमुळे ऋतू आणि दिवस आणि रात्रीची लांबी निश्चित होते.
जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यावेळी एक वेळ अशी येते जेव्हा सूर्याचा कल उत्तर गोलार्धाकडे सर्वात जास्त असतो. 21 जूनला सूर्य कर्क राशीला लंब असतो. या दिवशी सूर्य सकाळी लवकर उगवतो आणि उशिरा मावळतो, त्यामुळे दिवस मोठा असतो. भारतामध्ये यावेळी दिवसाची लांबी 13 तासांपेक्षा जास्त असते, तर सामान्य दिवशी ती सुमारे 12 तास असते.
अनेक संस्कृतींमध्ये 21 जूनचा दिवस विशेष मानला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून देखील साजरा केला जातो. असे मानले जाते की, हा निर्णय संयुक्त राष्ट्रांनी 2015 मध्ये घेतला होता. कारण या दिवशी उर्जेचे संतुलन सर्वोत्तम असते. प्राचीन परंपरेनुसार, अनेक संस्कृतीमध्ये सूर्याची पूजा केली जात असे आणि सर्वात मोठा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जात असे कारण हा दिवस शेती, हवामान आणि प्रकाशाशी संबंधित मानला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)