कॉमेडी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांची पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
तुमचा दिवस कसाही जावो या अभिनेत्याचा एक अभिनय तुम्हाला खळखळून हसायला भाग पडतोच तो अभिनेता म्हणजे लक्ष्या. लक्ष्मीकांत बेर्डे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अफलातून कॉमेडी आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले. ‘मी आलो… मी पाहिलं… मी लढलो.. मी जिंकून घेतलं सारं’ या गाण्याच्या ओळीप्रमाणेच त्यांचा जीवनप्रवास खऱ्या अर्थाने राहिला. कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी फिल्मफेर पुरस्कारासाठी चार नामांकने मिळाली. त्यांनी सुमारे 185 हिंदी आणि मराठी चित्रटांमध्ये काम केले. मात्र आजच्या दिवशी 2004 साली अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्वांना हसायला लावणार हा अवलिया जगाचा निरोप घेऊन निघून गेला. आजही घराघरामध्ये लक्ष्याचे चित्रपट तितक्याच आवडीने पाहिले जातात.
16 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
16 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
16 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






