SIR प्रक्रियेत मतदार यादीतून नाव वगळू नये म्हणून 'हे' काम आतापासूनच करा....
Explainer: बिहारनंतर, निवडणूक आयोग आता देशभरात विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) करण्याची तयारी करत आहे. मतदार यादीच्या अखिल भारतीय विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) मोहिमेबाबत निवडणूक आयोग एक मोठी पत्रकार परिषद घेण्यात आली. निवडणूक आयोगाने बिहारनंतर देशातील १० ते १५ राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात SIR प्रक्रिया राबवणार असल्याची घोषणा केली आहे.
या १०-१५ राज्यांमध्ये आसाम, तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ आणि बंगाल या राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया सुरू होऊ शकते. पुढील वर्षी या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे, निवडणूक आयोग या राज्यांना प्राधान्य देऊ शकते. पण त्याचवेळी देशभरातील लोक SIR बाबत साशंकदेखील आहेत. एसआयआर प्रक्रियेदरम्यान आपले नाव मतदार यादीतून वगळू नये, अशी चिंता नागरिकांना सतावत आहे.
8th Pay Commission : 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, आठव्या वेतन आयोगाला मंजुरी
बिहारमध्ये SIR दरम्यान ४७ लाख नावे वगळण्यात आली, ज्यामुळे अनेक वैध मतदार प्रभावित झाले. अशा परिस्थितीत, घाबरू नका. निवडणूक आयोगाने आश्वासन दिले आहे की सूचना न देता कोणतेही नाव काढून टाकले जाणार नाही आणि सुनावणीची व्यवस्था केली जाईल.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही आतापासूनच तयारी केली तर तुमचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही. तुमचे नाव मतदार यादीत कायम स्वरूपी राहण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील तुमचे नाव तपासणे आवश्यक आहे. यासाठी, निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या वेबसाइटला भेट द्या आणि “मतदार यादीत तुमचे नाव शोधा” या पर्यायावर क्लिक करा. येथे तुमचा EPIC क्रमांक (मतदार ओळख क्रमांक), मोबाईल नंबर किंवा नाव आणि जिल्हा टाकून पडताळणी करता येते. ही प्रक्रिया केवळ दोन मिनिटांत पूर्ण होते.
जर तुमचे नाव यादीत दिसले नाही, तर काळजी करण्याचे कारण नाही. विशेष पुनरावलोकन (SIR) दरम्यान बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घरोघरी भेट देतील आणि ओळख व पत्ता पुरावे मागवतील. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने काही कागदपत्रे वैध मानली आहेत. यामध्ये आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्सचा समावेश आहे. स्थलांतरित मतदारांसाठी रेशन कार्ड, वीज/पाणी बिल किंवा भाडे करार आवश्यक आहेत. पर्यायी कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड, मनरेगा कार्ड आणि बँक पासबुक यांचा समावेश आहे.
जर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसतील, तर बीएलओला कळवा. सरकारी डेटाबेसमधून तुमची माहिती तपासली जाईल.
फॉर्म ६: नवीन नाव नोंदवण्यासाठी किंवा दुरुस्तीकरिता (१८ वर्षांवरील नागरिकांसाठी).
फॉर्म ७: डुप्लिकेट किंवा मृत मतदारांची नावे वगळण्यासाठी.
फॉर्म ८: पत्ता, नाव किंवा तपशील अद्ययावत करण्यासाठी.
हे फॉर्म ऑनलाइन nvsp.in वर किंवा ऑफलाइन बीएलओ/ईआरओ कार्यालयात जमा करता येतात. मसुदा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ७ ते १५ दिवसांच्या आत दावा किंवा हरकत दाखल करणे आवश्यक आहे. जर तुमचे नाव वगळले गेले, तर ७ दिवसांच्या आत अपील करण्याचा अधिकार आहे. ईआरओ आणि सीईओ यांच्या माध्यमातून द्विस्तरीय अपील प्रणाली अस्तित्वात आहे. सर्वोच्च न्यायालयाने पारदर्शकता राखण्याचे निर्देश दिले आहेत आणि वगळण्याचे कारण सार्वजनिक केले जाईल.
२ मिनिटांत तपासा voters.eci.gov.in
EPIC क्रमांक / मोबाईल / नावाने शोधा
जर नाव नसेल दिसले, तर काळजी करू नका!
बीएलओ घरी येतील — ओळखपत्र दाखवा:
आधार / मतदार ओळखपत्र / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स
स्थलांतरितांसाठी: वीज बिल / रेशन कार्ड / भाडे करार
फॉर्म्स:
फॉर्म 6 – नवीन नाव नोंदणी
फॉर्म 7 – चुकीचे नाव काढणे
फॉर्म 8 – तपशील अपडेट






