लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता (फोटो - टीम नवराष्ट्र)
स्वरांच्या दुनियेवर राज्य करणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज जगाच्या कोपऱ्यात आजही कुठे ना कुठे ऐकला जात असेल. लता मंगेकर यांनी आपल्या मंत्रमुग्ध गायनाने अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले. कधी आपल्या आवाजाने रडवले तर कधी हसवले. श्रोत्यांच्या मनातील भावना जागृत करुन त्याच्या डोळ्यात पाणी आणण्याची ताकद लता दीदींच्या स्वरामध्ये होती. सरस्वतीचा आशिर्वाद लाभलेल्या लता मंगेशकर यांनी संगीताच्या दुनियेमध्ये धुव्रपद मिळवले आहे. भारतीय भाषांमध्ये ३०,००० हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील महान गायिकांपैकी एक मानले जाते. 1990 साली गायिका लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर २००१ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न मिळाला.