स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव राजाराम महाराज यांची आज पुण्यतिथी. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे पराक्रमी शासक होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत राज्यकारभार स्वीकारला. औरंगजेबाच्या आक्रमणांना तोंड देत त्यांनी मराठा साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. जिंजी किल्ल्यावरून त्यांनी मुघलांविरुद्ध लढा चालू ठेवला आणि स्वराज्याची धुरा सांभाळली. त्यांच्या धैर्य, चिकाटी आणि दूरदृष्टीमुळे मराठा साम्राज्य मजबूत राहिले. २ मार्च १७०० रोजी त्यांचे सिंहगडावर निधन झाले. (Dinvishesh)
देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये 2 मार्च रोजी घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
02 मार्च रोजी जन्म दिनविशेष
02 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष
1568: ‘मीरा रत्नसिंह राठोड’ – यांचे निधन.
1700: ‘छत्रपती राजाराम महाराज’ – मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती यांचे सिंहगडावर निधन. (जन्म: 24 फेब्रुवारी 1670)
1830: ‘डी. एच. लॉरेन्स’ – इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार यांचे निधन. (जन्म: 11 सप्टेंबर 1885)
1949: ‘सरोजिनी नायडू’ – प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी यांचे निधन.
1976: ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ – मराठी चित्रपट अभिनेते यांचे निधन.
1994: ‘पं. श्रीपादशास्त्री जेरे’ – धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न यांचे निधन.






