जागतिक हास्य दिन (फोटो- istockphoto)
पुणे/प्रगती करंबेळकर: ‘हास्य योगा’ मानसिक आणि शारीरिक आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी प्रभावी उपाय आहे. आज जगभर हास्य दिवस साजरा केला जातो जागतिक हास्य दिन हास्याची कला आणि व्यक्तींना ताजेतवाने आणि बरे करण्याची त्याची उल्लेखनीय क्षमता साजरी करण्यासाठी समर्पित आहे. हा आपल्या दैनंदिन जीवनात विनोद आणि हास्याचे महत्त्व लक्षात घेण्याचा क्षण आहे. हा वार्षिक उत्सव मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.
जागतिक हास्य दिन दरवर्षी ५ मे रोजी साजरा केला जातो आणि यावर्षी तो रविवारी साजरा केला जाईल. जागतिक हास्य दिनाची सुरुवात १९९८ मध्ये जागतिक हास्य योग चळवळीचे दूरदर्शी डॉ. मदन कटारिया यांच्या प्रयत्नातून झाली. भारतातील एक सराव करणारे फॅमिली डॉक्टर, डॉ. कटारिया यांनी चेहऱ्यावरील अभिप्राय गृहीतकातून प्रेरणा घेतली, जे सूचित करते की चेहऱ्यावरील हावभाव भावनांवर प्रभाव टाकू शकतात, आणि हास्य योग चळवळ सुरू केली.
मदन काटरिया यांच्या शिष्य अर्चना राव यांच्याशी हास्य योगा बद्दल संवाद साधला. त्यांनी त्यांच्या कॉर्पोरेट जीवनापासून ते लाफ्टर योगा इंडियाच्या स्थापने पर्यंतचा प्रवास सांगितला त्या म्हणाल्या ” लाफ्टर योगा हे स्वस्थ आरोग्य ठेवण्यासाठी उपयोगी पडते. मी जेव्हा मानसिक तणावात होते आणि हसण्यासाठी कारण शोधत होते तेव्हा मला मदन कटारिया यांचा विडियो दिसला आणि मी त्या पासून ठरवलं की या हास्य योगा मधूनच लोकांना हसण्याचे महत्व सांगायचे आणि मग मी लाफ्टर योगा इंडियाची स्थापना केली. जेव्हा मी हास्य योगा सुरु केला तेव्हा मला मायग्रेन चा त्रास होता हास्य योगाने तो आता दूर झाला. ‘लाफ्टर योगा इंडिया’ दहा वर्ष झाली मी जवळजवळ ६०, ००० पेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षण दिले. कॅन्सर, एड्स सारख्या रुग्णांनाही प्रशिक्षण दिले आहे. ज्यां रुग्णांकडे जगण्यासाठी कमी वेळ असतो आणि जेव्हा ते सगळं विसरून खळखळून हसतात तेव्हा माझ्या कामाचा हेतू पूर्ण झाल्यासारखा मला वाटतो.
अर्चना राव यांच्या ‘लाफ्टर योगा इंडिया’ संस्थचे ब्रीदवाक्य आहे ‘ उद्या नसल्यासारखे जगा’ या ब्रीद वाक्यावर त्या अर्चना म्हणाल्या , “कोरोनाच्या वेळी कळले की आयुष्य किती क्षणभंगूर आहे उद्या आपण असू की नाही याची शाश्वती नाही म्हणूनच उद्या नसल्यासारखे जगा आणि हसा”
हास्य योगाबद्दल सांगताना अर्चना राव यांनी वेगवेगळ्या योगाचे प्रकार सांगितले. त्या हे योगाचे प्रकार सांगाताना म्हणाल्या ज्या गोष्टी कडे पाहून आपल्या वाईट वाटत तणाव येतो त्या गोष्टीकडे बघून हसायचं जसं की वृद्धांसाठी त्यांच्या आरोग्याचा अहवालास पाहत हसण्याचा योगा, शालेय मुलांसाठी त्यांचे श्रेणी पुस्तकाकडे बघत हसण्याचा योगा, कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांचा त्यांच्या न वाढलेल्या पागरकडे बघत हसणारा योगा असे विलक्षण योगा त्या घेतात. त्यांच्या म्हणण्यानुसार खोटं हसणेही आपल्या आरोग्यासाठी चांगले असते.
हास्य योगाचे फायदे
– मानसिक तणाव दूर होतो
– रोगप्रतिकारक शक्ती वाढते
– शारीरिक थकवा दूर होतो
– हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते.