फोटो सौजन्य: गुगल
“देश हा देव असे माझा” या गाण्याच्या ओळी ऐकल्या की उर भरुन येतो. 18 पगड जाती, धर्म, राज्य आणि त्यांच्या परंपरा या सगळ्यात विविधता असली तरी तरी एकात्मतेची भावना आहे. त्या भाननेची प्रेरणा म्हणजे भारतीय असणं. धर्म नंतर पहिले राष्ट्रहित ही या भारताच्या मातीची शिवकण आहे. हे आजच्या दिवशी सांगण्याचं कारण म्हणजे 23 मार्च हा दिवस भारतात शहिद दिन म्हणून गौरविण्यात येतो. शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी वीर मरण पत्कारलं तोच हा दिवस. देशाला परकीय गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक क्रांतीकारकांनी स्वत:च्या रक्ताचे पाट वाहिले. त्यातील तीन नावं म्हणजे भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरु.
पंजाबचा शौर्य आणि वीरतेचा वारसा हा पुर्वापार चालत आलेला आहे. लायलपूर हे आता जरी पाकिस्तानात असलं तरी हा पुर्वीचा पंजाबचा एक भाग होता. याच लायलपूर भगतसिंह याचं बालपण गेलं. ब्रिटीश सरकाराने भगतसिंहच्या वडीलांवर आणि काकांवर ज्या प्रकारे अमानुष अत्याचार केले त्यामुळे सूडाने पेटून उठलेल्या भगतसिंह लहान वयातचं क्रांतिकारी चळवळीत सक्रिय झाले.
“इंक्लाब झिंदाबाद” हा नारा भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचा नारा आहे, जो भगत सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला होता. “इंक्लाब” म्हणजे “क्रांती” आणि “झिंदाबाद” म्हणजे “जीवित राहो” किंवा “जय” असे दर्शवते. त्यामुळे “इंक्लाब झिंदाबाद” चा अर्थ होतो “क्रांती सजीव रहो” किंवा “क्रांती जिंदाबाद”.हा नारा अनेक सामाजिक, राजकीय आणि स्वातंत्र्याच्या चळवळींमध्ये वापरला जात होता. आपल्या हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्यांना प्रेरणा देणारा हा नारा आहे.
1931 साली देशात सायमन कमिशन आलं,. याला कांतीकारकांनी विरोध केला. सायमन गो बॅक असा नारा सुरु झाला. त्यानंतर लाला रायपत राय यांच्यावर जॉन. पी. सॅण्डर्सची या ब्रिटीश ऑफिसरने लाठीचार्ज केला आणि त्यातच लाला रायपत राय यांचा मृत्यू झाला. परकीय सत्तेच्या गुलामगिरीला वेळीच ठेचणं गररजेचं आहे या भावनेने सुखदेव, राजगुरु आणि भगतसिंह यांनी सॅंडर्स अधिकारी याला ठार मारण्याची शपथ घेतली. लाहोरच्या ब्रिटीश ऑफिसमध्ये वेषांतर करुन या तीनही क्रांतिकारकांनी जॉन. पी. सॅण्डर्सला गोळ्या घालून ठार केलं. या इंग्रज ऑफिसरच्या हत्येच्या आरोपाखाली तीनही क्रांतिकारकांना ब्रिटीशांनी फाशी दिली. भगतसिंह यांनी वयाच्या केवळ 23 वर्षात देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रणांची आहुती दिली. भगतसिंहाच्या या बलिदाने अवघा देश पेटून उठला. स्वातंत्र्याची आग प्रत्येक क्रांतीकारकाच्या डोळ्यात धगधगत होती. 23 वर्ष केवळ आणि केवळ देशसेवेसाठी आपलं आयुष्य वाहणारे भगत सिंह, देशासाठी प्राण हातावर घेणारे सुखदेव आणि राजगुरु यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ 23 मार्च हा दिवस शहिद दिन गौरविण्यात येतो.