• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • National Science Day 2026 Woman In Sicence Rural Girls Education

National Science Day 2026 : ग्रामीण मुलींच्या पंखांना संशोधनाचे बळ; असा घडतोय ‘विकसित भारत’

National Science Day : देशात आज राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होत आहे. यंदा हा दिवस ‘विज्ञानातील महिला' : 'उत्प्रेरक विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित आहे. ग्रामीण भागातील मुलींच्या क्षमतेकडे लक्ष वेधणारी ही संकल्पना आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 28, 2026 | 08:57 AM
National Science Day 2026

National Science Day 2026 : ग्रामीण मुलींच्या पंखांना संशोधनाचे बळ; असा घडतोय 'विकसित भारत' (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सुनयना सोनवणे : देशात आज राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जात आहे. आजचा हा दिवस, भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी लावलेल्या रमन परिणामाच्या शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. या संशोधनासाठी त्यांना १९३० साली भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९८६ मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय विज्ञान दिन जाहीर केला होता आणि १९८७ पासून तो देशभर साजरा केला जाऊ लागला.

यंदा हा दिवस ‘विज्ञानातील महिला’ : ‘उत्प्रेरक विकसित भारत’ या संकल्पनेखाली साजरा होत आहे. याच निमित्ताने एक प्रश्न नव्याने समोर येतो तो म्हणजे विकसित भारताच्या स्वप्नात ग्रामीण भागातील मुलींची भूमिका किती महत्त्वाची आहे? शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात विज्ञान शिक्षणाच्या संधी अजूनही मर्यादित आहेत. प्रयोगशाळांची कमतरता, आर्थिक अडचणी, सामाजिक बंधने आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव या सगळ्यांमुळे अनेक प्रतिभावान मुलींची स्वप्ने अर्ध्यावर थांबतात. तरीही बदलाची चाहूल लागली आहे.

Marathi Bhasha Din : ‘मराठी भाषा गौरव दिन’ अन् ‘मराठी राजभाषा दिनात गल्लत होतेय; जाणून घ्या काय फरक आहे?

विकसित भारताच्या उभारणीत महिला शास्त्रज्ञांचे योगदान, नेतृत्व आणि नवोन्मेषी भूमिका अधोरेखित करणे हा यंदाच्या थीमचा केंद्रबिंदू आहे. संशोधन, अवकाश तंत्रज्ञान, वैद्यकीय विज्ञान, जैवतंत्रज्ञान, पर्यावरण अभ्यास, डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रांत भारतीय महिलांनी भक्कम ठसा उमटविला आहे. तज्ज्ञांच्या मते, विज्ञान क्षेत्रातील महिलांचा व्यापक आणि सक्षम सहभाग हीच काळाची गरज आहे.

ग्रामीण विकास अभ्यासक प्रा.अनिल पाटील सांगतात, ‘विज्ञानातील महिलांचा सहभाग वाढविल्याशिवाय विकसित भारताची उभारणी शक्य नाही. कृषी तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन, आरोग्य सेवा, अक्षय ऊर्जा या क्षेत्रांत ग्रामीण पार्श्वभूमीच्या महिला शास्त्रज्ञांचे योगदान अत्यंत उपयुक्त ठरू शकते. गावातील मुली विज्ञान शिकल्या, तर त्या स्थानिक समस्यांवर स्थानिक उपाय शोधू शकतात.’

मराठवाड्यातील एका छोट्याशा खेड्यात वाढलेली पूजा सोनसाळे सध्या सूक्ष्मजीवशास्त्रात पीएच.डी. करत आहे. तिचे संशोधन ग्रामीण भागातील पाणीशुद्धीकरणासाठी सूक्ष्मजीवांचा वापर यावर आधारित आहे. ती सांगते, ‘लहानपणी आमच्या गावात टँकरने येणाऱ्या अशुद्ध पाण्यामुळे रोगराई वाढायची. त्या अनुभवातूनच मला संशोधनाची दिशा मिळाली. विज्ञान हे केवळ पदवी मिळवण्याचे साधन नसून ते समस्यांचे उत्तर आहे.’ पूजासारख्या संशोधक मुली ग्रामीण वास्तवातूनच संशोधनाची बीजे घेतात आणि त्यातूनच विकसित भारताची नवी दिशा तयार होत आहे.

केंद्र सरकारच्या ‘उमेद’ योजनेतून ‘नमो ड्रोन दिदी’ उपक्रमासाठी अर्ज करून पुणे जिल्ह्यातील पहिल्या महिला ड्रोन पायलट बनलेल्या नीलम दिवेकर यांची कहाणीही प्रेरणादायी आहे. त्या सांगतात, ‘पूर्वी आम्ही पारंपरिक शेती करत होतो. आता ड्रोनमुळे वेळ, खर्च आणि मजुरी वाचते. गावातील मुलींनाही तंत्रज्ञान शिकण्याची प्रेरणा मिळते. ड्रोनच्या माध्यमातून कीडनाशक फवारणी, पिकांचे निरीक्षण आणि मातीचे विश्लेषण ही कामे आज सहज होत आहेत. विज्ञान हे केवळ पुस्तकापुरते नसून प्रत्यक्ष आयुष्यात कसे उतरते याचे हे जिवंत उदाहरण आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये प्रयोगाधारित शिक्षण रुजवण्यासाठी प्रयत्नशील असलेले माध्यमिक शिक्षक अनिल कुटवाड सांगतात, ‘ग्रामीण शाळांमध्ये प्रयोगशाळा मर्यादित असल्या तरी मुलींची जिज्ञासा अमर्याद असते. त्यांना योग्य दिशा आणि संधी मिळाली तर त्या कमाल करू शकतात.

यावर्षीची थीम केवळ घोषवाक्य न राहता कृतीत उतरली पाहिजे. गावातील मुली विज्ञानात पुढे आल्या, तर विकसित भारताचा पाया खऱ्या अर्थाने मजबूत होईल. विज्ञान हे त्यांच्यासाठी पर्याय नाही, तर परिवर्तनाची ताकद आहे.’ विशेष म्हणजे, सलग बारा वेळा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि त्यात मुलींची संख्या नेहमीच अधिक राहिली आहे.

Central Excise Day 2026 : २४ फेब्रुवारीला साजरा केला जातो केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस; जाणून घ्या डिजिटल युगातील महत्व

Web Title: National science day 2026 woman in sicence rural girls education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • national science day
  • science news

संबंधित बातम्या

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नवकल्पना आणि प्रगतीचा उजळूया मार्ग
1

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नवकल्पना आणि प्रगतीचा उजळूया मार्ग

Zoological Survey News: पुण्यात उभारणार ‘वेस्टर्न घाट्स फॉना रिपॉझिटरी’ ; जैवविविधता संशोधनाला नवे बळ
2

Zoological Survey News: पुण्यात उभारणार ‘वेस्टर्न घाट्स फॉना रिपॉझिटरी’ ; जैवविविधता संशोधनाला नवे बळ

Jurassic Mystery: विज्ञान विश्वात खळबळ! 7 कोटी वर्षांपूर्वीच्या डायनासोरचं ‘अंड’ सापडलं; आत जिवंत बाळ असण्याची शक्यता
3

Jurassic Mystery: विज्ञान विश्वात खळबळ! 7 कोटी वर्षांपूर्वीच्या डायनासोरचं ‘अंड’ सापडलं; आत जिवंत बाळ असण्याची शक्यता

Atacama Desert: चिली सरकारचा अभूतपूर्व आणि साहसी निर्णय; अमेरिकन कंपनीला डच्चू देऊन वाचवले अटाकामाचे निर्मळ नीलगगन
4

Atacama Desert: चिली सरकारचा अभूतपूर्व आणि साहसी निर्णय; अमेरिकन कंपनीला डच्चू देऊन वाचवले अटाकामाचे निर्मळ नीलगगन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
National Science Day 2026 : ग्रामीण मुलींच्या पंखांना संशोधनाचे बळ; असा घडतोय ‘विकसित भारत’

National Science Day 2026 : ग्रामीण मुलींच्या पंखांना संशोधनाचे बळ; असा घडतोय ‘विकसित भारत’

Feb 28, 2026 | 08:57 AM
लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र झळकणार Vijay आणि Rashmika; ‘या’ तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार

लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र झळकणार Vijay आणि Rashmika; ‘या’ तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार

Feb 28, 2026 | 08:50 AM
Free Fire Max: गेममधील नव्या इव्हेंटने प्लेअर्स झाले खुश… सुपर लेग पॉकेटसह मिळणार हे रिवॉर्ड्स, असे करा अनलॉक

Free Fire Max: गेममधील नव्या इव्हेंटने प्लेअर्स झाले खुश… सुपर लेग पॉकेटसह मिळणार हे रिवॉर्ड्स, असे करा अनलॉक

Feb 28, 2026 | 08:43 AM
पॅरीस, मालदीव नाही तर हनिमूनसाठी हे डेस्टिनेशन्स ठरतायंत खास, निसर्गाच्या सानिध्यात घेता येतो रोमँटिक वातावरणाचा अनुभव

पॅरीस, मालदीव नाही तर हनिमूनसाठी हे डेस्टिनेशन्स ठरतायंत खास, निसर्गाच्या सानिध्यात घेता येतो रोमँटिक वातावरणाचा अनुभव

Feb 28, 2026 | 08:34 AM
प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २८ फेब्रुवारीचा इतिहास

प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २८ फेब्रुवारीचा इतिहास

Feb 28, 2026 | 08:33 AM
Solapur Crime: पती-पत्नीचे संशयास्पद मृत्यू; घरात तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह, आत्महत्या की घातपात

Solapur Crime: पती-पत्नीचे संशयास्पद मृत्यू; घरात तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह, आत्महत्या की घातपात

Feb 28, 2026 | 08:31 AM
Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Feb 28, 2026 | 08:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.