Ryugyong Hotel ची काय आहे कहाणी, खरंच आहे का हे भुतांचं हॉटेल
उत्तर कोरिया केवळ आपल्या अनोख्या कायद्यांसाठी आणि क्षेपणास्त्र चाचण्यांसाठी ओळखला जात नाही तर त्याची राजधानी प्योंगयांगमध्ये असलेली एक रहस्यमय इमारत देखील लोकांचे लक्ष वेधून घेते. हे पिरॅमिडल गगनचुंबी इमारत, ज्याला Ryugyong किंवा Yu-kyung (Ryugyong Hotel) म्हणूनही ओळखले जाते, ते खरेतर एक अर्धवट आणि अपूर्ण हॉटेल आहे जिथे कोणीही राहिले नाही. या लेखात सविस्तर कारण जाणून घेऊया.
105 खोल्यांची रहस्यमयी इमारत
हे 330 मीटर उंचीचे हॉटेल 105 खोल्या असलेली एक विशाल रचना आहे, जी बाहेरून अतिशय आकर्षक दिसते, परंतु आजपर्यंत एकही माणूस या हॉटेलच्या आतमध्ये राहिलेला नाही. लोक या निर्जन इमारतीला ‘कर्स्ड हॉटेल’ (भुताचे हॉटेल) किंवा ‘झपाटलेले हॉटेल’ म्हणतात. त्याला ‘105 बिल्डिंग’ असेही म्हणतात.
काही वर्षांपूर्वी, अमेरिकन नियतकालिक ई-स्क्वेअरने या हॉटेलला ‘मानवी इतिहासातील सर्वात वाईट इमारत’ म्हणून दर्जा दिला होता. या हॉटेलबद्दल अनेक विचित्र कथा प्रचलित आहेत, ज्यामुळे ते आणखीनच रहस्यमय झाले आहे असे सांगण्यात येते. मात्र यामागील नक्की तथ्य काय आहे याबाबत कोणालाच माहीत नाही
भरभक्कम खर्च
तब्बल 55 अब्ज रुपये खर्चून बांधलेले हे हॉटेल उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार होता, त्या वेळी देशाच्या एकूण उत्पन्नाच्या दोन टक्के वाटा होता. जगातील सर्वात उंच हॉटेल बनण्याचे स्वप्न पाहणारा हा प्रकल्प अपूर्णच राहिला आणि आज जगातील सर्वात उंच ‘विराण’ इमारत म्हणून प्रसिद्ध आहे.
या अनोख्या विक्रमासाठी त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही स्थान मिळाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर ती जगातील सातव्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत ठरली असती आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनू शकली असती असे सांगण्यात येते
बांधण्यात आल्या अनेक अडचणी
या इमारतीचे बांधकाम 1987 मध्ये सुरू झाले. त्यावेळी ते दोन वर्षांत तयार होईल, अशी अपेक्षा होती, मात्र बांधकाम सुरू असताना बांधकाम साहित्याचा तुटवडा, बांधकामासंबंधी तांत्रिक अडचणी अशा अनेक समस्या समोर आल्या. या समस्यांमुळे बांधकामे वारंवार थांबत राहिली. सन 1992 मध्ये उत्तर कोरियाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने बांधकाम पूर्ण ठप्प झाले. मात्र, 2008 मध्ये पुन्हा बांधकाम सुरू झाले. या भव्य इमारतीची व्यवस्था करण्यासाठी सुमारे 11 अब्ज रुपये खर्च करण्यात आले. यानंतर इमारतीमध्ये काचेचे फलक बसविण्यात आले व इतर किरकोळ कामे पूर्ण करण्यात आली.
असे गाव जिथे नवरीला द्यावी लागते ‘ही’ परीक्षा, नाहीतर आईच होते वैरीण; खावे लागतात फटके
आजही काम अपूर्णच
2012 मध्ये उत्तर कोरियाच्या सरकारने या हॉटेलचे बांधकाम लवकरच पूर्ण करण्याचा दावा केला होता. मात्र, अनेक वेळा तारखा बदलूनही हे हॉटेल आजतागायत अपूर्णच आहे. बांधकामाच्या कामात वारंवार अडथळे येत असल्याने प्रकल्प अपूर्णच राहिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे प्रोजेक्ट कधी पूर्ण होणार की नाही शंकाच आहे आणि अजूनही याचे गूढ उकललेले नाही