आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रत्येक अंतराळवीराला का दिला जातो एक विशिष्ट 'क्रमांक'? जाणून घ्या त्यामागचं शास्त्रीय कारण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ISS astronaut numbers meaning : भारतीय अंतराळवीर शुभ्रांशू शुक्ला यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) आपली पहिली रात्र घालवली. त्यांच्या आगमनानंतर लगेचच त्यांना एक खास क्रू आयडी नंबर देण्यात आला. आता प्रश्न असा की, प्रत्येक अंतराळवीराला असा खास क्रमांक का दिला जातो? त्याचा नक्की उपयोग काय असतो? याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला इतिहास, तांत्रिक गरजा आणि सुरक्षा प्रक्रियांमध्ये सापडतात.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) सुरक्षा, ओळख, आणि सिस्टम लॉगिंग या कारणांसाठी प्रत्येक अंतराळवीराला वेगळा क्रमांक किंवा आयडी दिला जातो. हे आयडी तांत्रिक नोंदी, वैद्यकीय परीक्षणे, वैज्ञानिक प्रयोग किंवा आपत्कालीन सराव यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ, एखादा अंतराळवीर एखादी वैद्यकीय चाचणी करत असल्यास, तो आपला नाव नव्हे, तर क्रू नंबर वापरून संबंधित प्रणालीमध्ये लॉग इन करतो. यामुळे कामकाजात शुद्धता आणि स्पष्टता राखली जाते.
जेव्हा एखादा अंतराळवीर स्पेसवॉक (EVA – Extra Vehicular Activity) करत असतो, तेव्हा त्याच्या स्पेससूटवर EVA-1, EVA-2 असे क्रमांक लिहिलेले असतात. कारण स्पेससूट घातल्यानंतर चेहरा ओळखणे फार कठीण होते. अशा वेळी, मिशन कंट्रोल आणि सहकारी अंतराळवीर या क्रमांकांवरून व्यक्तीची ओळख पटवतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Canada-China Relations : कॅनडाचा चीनवर मोठा घाव! ‘या’ कंपनीला देशातून हाकलले, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
ISS वर अनेक देशांतील अंतराळवीर काम करतात. त्यांची नावे किंवा आवाज सारखे असू शकतात. जसे की, दोन जणांचे नाव ‘क्रिस’ असल्यास रेडिओवर संभाषणात गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे तांत्रिक संवादात क्रू नंबरचा वापर अत्यावश्यक ठरतो.
अंतराळ मोहिमांच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे 1960 च्या दशकात, अशा प्रकारचे क्रमांकन नव्हते. त्यावेळी अंतराळवीरांना त्याच्या नावाने किंवा मिशनच्या कॉल साइनने ओळखले जात होते. मात्र, 1970 नंतर, विशेषतः स्पेस स्टेशन्सवरील दीर्घकालीन मोहिमांदरम्यान, पहिल्यांदा क्रमांक पद्धतीचा वापर सुरू झाला. NASA ने ही प्रणाली स्पेस शटल युगात (1981 नंतर) अधिकृतरित्या स्वीकारली. तेव्हापासून EVA मोहिमांमध्ये सहभाग घेतलेल्या अंतराळवीरांना क्रमांक दिला जातो.
1. राकेश शर्मा (1984) यांना कोणताही खास क्रू नंबर देण्यात आला नव्हता. त्यांच्या मोहिमेचे कॉल साइन ‘ज्युपिटर’ होते.
2. कल्पना चावला यांना STS-87 मिशनमध्ये MS-1 (Mission Specialist-1) ही जबाबदारी दिली होती. त्यांनी स्पेसवॉक केला नव्हता, त्यामुळे त्यांना EVA क्रमांक मिळाला नाही.
3. सुनीता विल्यम्स यांनी STS-116 मिशनमध्ये सहभाग घेतला आणि चार स्पेसवॉक केले. त्यामध्ये त्यांना EVA-1, EVA-2 असे क्रमांक मिळाले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : एस. जयशंकर यांचा इराणी परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद; भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या मदतीबद्दल इराणचे आभार
अंतराळातील मिशन्स अत्यंत तांत्रिक आणि जोखमीच्या असतात. अशा मोहिमांमध्ये एखाद्या चुकलेल्या नावामुळे किंवा संभाषणातील गोंधळामुळे मोठा अपघात होऊ शकतो. म्हणूनच, प्रत्येक अंतराळवीराला खास क्रू आयडी दिला जातो – ज्याचा उपयोग आवश्यक त्या तांत्रिक आणि सुरक्षा प्रक्रियेसाठी होतो. या नंबरांमुळे नक्की कोण काय करत आहे, कुठे आहे, आणि कोणत्या प्रणालीशी जोडलेला आहे याची अचूक माहिती मिशन कंट्रोलला मिळते. आणि अंतराळातील सुरक्षिततेचा हा एक महत्त्वाचा भाग ठरतो.