• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Wildlife Conservation Day World Wildlife Day 2025 Join The Global Effort To Protect Nature

World Wildlife Day 2025 : पृथ्वीचा श्वास रोखला जातोय? पण वन्यजीव संरक्षण हाच मानवतेसाठी खरा विकासमार्ग

World Wildlife Day 2025 : दरवर्षी 3 मार्च रोजी आपण जागतिक वन्यजीव दिन साजरा करतो. वन्यजीवांचे महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 04, 2025 | 09:14 AM
Wildlife Conservation Day World Wildlife Day 2025 Join the global effort to protect nature

वन्यजीव संरक्षण दिन : जागतिक वन्यजीव दिन २०२५: निसर्गाचे रक्षण करण्याच्या जागतिक प्रयत्नात सामील व्हा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  1. ३ मार्च रोजी साजरा होणारा जागतिक वन्यजीव दिन २०२५ ‘वन्यजीव संवर्धन वित्त: लोक आणि ग्रहात गुंतवणूक’ या थीमवर केंद्रित आहे.
  2. जंगलतोड, प्रदूषण, हवामान बदल आणि अवैध शिकार यामुळे हजारो प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
  3. शाश्वत आर्थिक गुंतवणूक आणि सामूहिक कृतीद्वारेच वन्यजीव आणि मानवतेचे भविष्य सुरक्षित होऊ शकते.
World Wildlife Day 2025 : दरवर्षी ३ मार्च रोजी साजरा केला जाणारा जागतिक वन्यजीव दिन (World Wildlife Day) हा केवळ एक दिवस नसून, तो निसर्ग आणि मानव यांच्यातील नाते अधिक सशक्त करण्याचा, जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करण्याचा आणि संकटात सापडलेल्या प्रजातींना वाचवण्यासाठी संयुक्त कृती करण्याचा जागतिक मंच आहे. यावर्षी २०२५ साठी संयुक्त राष्ट्रांनी निश्चित केलेली थीम आहे. “वन्यजीव संवर्धन वित्त: लोक आणि ग्रहात गुंतवणूक”. ही थीम सध्या अपुर्‍या आणि असंतुलित आर्थिक प्रवाहांकडे लक्ष वेधते आणि त्यांना अधिक प्रभावी, पारदर्शक व शाश्वत कसे बनवता येईल, याचा सखोल विचार करण्याचे आवाहन करते.

जागतिक वन्यजीव दिनाची मुहूर्तमेढ २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने रोवली आणि १९७३ मध्ये या दिवशीच CITES अर्थात ‘धोक्यात आलेल्या प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराविरुद्ध करार’ (Convention on International Trade in Endangered Species) वर स्वाक्षरी करण्यात आली होती, म्हणून ३ मार्च हा दिवस निवडण्यात आला. हा करार वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी आयतिहासिक मानला जातो. आज हा करार १८० हून अधिक देशांनी स्वीकारलेला असून, लाखो प्रजातींच्या संरक्षणात तो महत्वाची भूमिका बजावत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Politics: पाकिस्तानात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे; PM शरीफांनी राजकारणाचा फास मुनीरभोवती घट्ट आवळला

वन्यजीव आणि वनस्पती केवळ सौंदर्याचा भाग नसून पृथ्वीवरील जैविक साखळीचे ते अत्यावश्यक घटक आहेत. अन्नसाखळी संतुलित ठेवणे, वातावरणातील ऑक्सिजन-कार्बनचे प्रमाण नियंत्रित करणे, मातीची सुपीकता टिकवणे, जलचक्र सुरळीत ठेवणे आणि मानवी आरोग्यासाठी आवश्यक औषधी वनस्पती पुरवणे, अशी महत्त्वाची कामगिरी ही जैवविविधता करत असते. मात्र, गेल्या काही दशकांत मानवाने केलेली जंगलतोड, औद्योगिक प्रदूषण, अनियंत्रित नागरीकरण, हवामान बदल आणि बेकायदेशीर शिकारी यामुळे हजारो प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक प्राणी आणि पक्षी आज नामशेष झाले असून अनेक धोक्याच्या यादीत आहेत.

२०२५ ची थीम आर्थिक बाबीकडे लक्ष वेधते, कारण संवर्धनासाठी केवळ भावनाच नव्हे तर भक्कम अर्थसंकल्प, गुंतवणूक आणि शाश्वत धोरणांची गरज आहे. जंगलसंवर्धन, अभयारण्ये, पुनर्वसन प्रकल्प, आदिवासी आणि स्थानिक समुदायांशी सहकार्य, तसेच पर्यावरणाशी सुसंगत पर्यटन यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ आवश्यक आहे. सरकारे, खासगी संस्था, स्वयंसेवी संघटना आणि सामान्य नागरिक यांनी एकत्र येऊन या दिशेने योगदान देणे ही काळाची गरज आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : SSB Alert : India-Nepal सीमेवर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर; घुसखोरांना रोखण्यासाठी दोन्ही देशाने घेतला ‘हा’ कठोर निर्णय

जागतिक वन्यजीव दिन आपल्याला वैयक्तिक जबाबदारीची जाणीव करून देतो. प्लास्टिकचा वापर टाळणे, झाडे लावणे, पर्यावरणपूरक वस्तू वापरणे, अवैध वन्यजीव व्यापाराविरोधात आवाज उठवणे आणि नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करणे, ही काही सोपी पण प्रभावी पावले आपण उचलू शकतो. पृथ्वी ही केवळ आपली नसून येणाऱ्या पिढ्यांचीही आहे, ही जाणीव बाळगूनच आपण निसर्गाशी सुसंवाद साधला पाहिजे.

थोडक्यात सांगायचे झाले, तर जागतिक वन्यजीव दिन २०२५ हा एक उत्सव नसून तो एक इशारा आहे – निसर्गाचे संरक्षण हे पर्याय नसून अपरिहार्य जबाबदारी आहे. जर आज आपण गुंतवणूक केली नाही, तर उद्या केवळ पश्चात्ताप उरेल. वन्यजीवांचे संरक्षण म्हणजे प्रत्यक्षात मानवजातीचेच संरक्षण आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो?

    Ans: दरवर्षी ३ मार्च रोजी.

  • Que: २०२५ ची थीम काय आहे?

    Ans: “वन्यजीव संवर्धन वित्त: लोक आणि ग्रहात गुंतवणूक”.

  • Que: हा दिवस महत्वाचा का आहे?

    Ans: वन्यप्राणी, जैवविविधता आणि पृथ्वीचे भविष्य वाचवण्यासाठी.

Web Title: Wildlife conservation day world wildlife day 2025 join the global effort to protect nature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 09:14 AM

Topics:  

  • navarashtra special
  • navarashtra special story
  • Wildlife Protection Act
  • World Wildlife Day

संबंधित बातम्या

International Bank Day : 4 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बँक दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या त्याचे महत्व
1

International Bank Day : 4 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बँक दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या त्याचे महत्व

International Day of Persons with Disabilities : 3 डिसेंबर का आहे इतका महत्त्वाचा? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचे महत्त्व
2

International Day of Persons with Disabilities : 3 डिसेंबर का आहे इतका महत्त्वाचा? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचे महत्त्व

World AIDS Day 2025 : दरवर्षी 1 डिसेंबरलाच जागतिक एड्स दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व आणि उद्देश
3

World AIDS Day 2025 : दरवर्षी 1 डिसेंबरलाच जागतिक एड्स दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व आणि उद्देश

Chemical Warfare Remembrance Day : विज्ञानाचा वापर विध्वंसासाठी नव्हे, तर कल्याणासाठी व्हावा याची आठवण करून देणारा ‘हा’ दिवस
4

Chemical Warfare Remembrance Day : विज्ञानाचा वापर विध्वंसासाठी नव्हे, तर कल्याणासाठी व्हावा याची आठवण करून देणारा ‘हा’ दिवस

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World Wildlife Day 2025 : पृथ्वीचा श्वास रोखला जातोय? पण वन्यजीव संरक्षण हाच मानवतेसाठी खरा विकासमार्ग

World Wildlife Day 2025 : पृथ्वीचा श्वास रोखला जातोय? पण वन्यजीव संरक्षण हाच मानवतेसाठी खरा विकासमार्ग

Dec 04, 2025 | 09:14 AM
अनर्थ! चिमुरड्यांनी प्यायले गुडनाईट लिक्विड अन्…; दापोलीत नेमके घडले तरी काय?

अनर्थ! चिमुरड्यांनी प्यायले गुडनाईट लिक्विड अन्…; दापोलीत नेमके घडले तरी काय?

Dec 04, 2025 | 09:13 AM
Top Marathi News Today Live : डॉ. गौरी गर्जे यांची आत्महत्या नसून हत्या; कुटुंबियांचा गंभीर आरोप

LIVE
Top Marathi News Today Live : डॉ. गौरी गर्जे यांची आत्महत्या नसून हत्या; कुटुंबियांचा गंभीर आरोप

Dec 04, 2025 | 09:12 AM
तुटलेल्या पापणीला रोहित शर्माने काय केली इच्छा! 2027 चा विश्वचषक की…पहा Funny Viral Video

तुटलेल्या पापणीला रोहित शर्माने काय केली इच्छा! 2027 चा विश्वचषक की…पहा Funny Viral Video

Dec 04, 2025 | 08:56 AM
Maharashtra Politics: “…अशी घटना पहिल्यांदाच घडली”; मंत्री योगेश कदमांचे निवडणुकीबाबत भाष्य

Maharashtra Politics: “…अशी घटना पहिल्यांदाच घडली”; मंत्री योगेश कदमांचे निवडणुकीबाबत भाष्य

Dec 04, 2025 | 08:56 AM
Zodiac Sign: दत्त जयंतीच्या दिवशी वृषभ आणि कर्क राशीसह देवी लक्ष्मीचा राहील आशीर्वाद

Zodiac Sign: दत्त जयंतीच्या दिवशी वृषभ आणि कर्क राशीसह देवी लक्ष्मीचा राहील आशीर्वाद

Dec 04, 2025 | 08:46 AM
Yavatmal Crime: यवतमाळमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून खून! पतीकडून पत्नीच्या प्रियकराची हत्या

Yavatmal Crime: यवतमाळमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून खून! पतीकडून पत्नीच्या प्रियकराची हत्या

Dec 04, 2025 | 08:44 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Dec 03, 2025 | 02:37 PM
ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Dec 03, 2025 | 02:32 PM
अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

Dec 03, 2025 | 02:29 PM
असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

Dec 03, 2025 | 02:25 PM
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Dec 03, 2025 | 02:19 PM
Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Dec 02, 2025 | 08:50 PM
राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

Dec 02, 2025 | 08:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.