World Laughter Day 2025: फक्त ६० मिनिटे हसल्याने होतात ४०० कॅलरीज बर्न; जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
मुंबई – आज ४ मे २०२५ याचदिवशी जगभरात जागतिक हास्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. यामागचा उद्देश फक्त हसवणे नाही, तर लोकांच्या जीवनात मानसिक, शारीरिक आणि सामाजिक सकारात्मकता वाढवणे हा आहे. तणावग्रस्त जीवनशैलीत हास्य हे एक प्रभावी औषध ठरू शकते, असा संदेश या दिनानिमित्त दिला जातो.
जागतिक हास्य दिनाची संकल्पना भारतात जन्माला आली. १९९८ मध्ये डॉ. मदन कटारिया यांनी मुंबईत पहिला हास्य दिन साजरा केला. फक्त १२ लोकांपासून सुरू झालेला हा उपक्रम आज जगभरातील शेकडो शहरांमध्ये पोहोचला आहे. डॉ. कटारिया यांना हास्य योगाचे जनक मानले जाते. त्यांचा उद्देश हास्याद्वारे जगात शांती, एकोपा आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे हा होता.
हे देखील वाचा : International Firefighters’ Day : कोण आहेत भारताच्या पहिल्या महिला अग्निशामक? वाचा त्यांची प्रेरणादायक कहाणी
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : What Is Western Disturbance : नक्की काय आहे हा ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’? ज्यामुळेच भारतात पडतो पाऊस
जगभरातील तणावपूर्ण वातावरणात, हास्य ही एक सशक्त, मोफत आणि कोणत्याही दुष्परिणामाशिवाय मिळणारी औषध आहे. जागतिक हास्य दिन २०२५ च्या निमित्ताने, आपण आपल्या जीवनात हसण्याचे क्षण अधिक निर्माण करायला हवेत. कारण – हसणे म्हणजे जगणे!






