कला ही माणसाचं जगण समृद्ध करते. मग ती कोणतीही कला असो. खरंतर आताच्य़ा युगात पाहायचं झालं तर अनेकांना कशाचा ना कशाचा ताण आहे. सध्याची तरुण पिढी ही मोठ्या प्रमाणात मानसिक नैराश्याने ग्रासलेली आहे. जर मन शांत असेल तर आरोग्य चांगलं राहतं. सततच्या मानसिक त्रासावर तज्ज्ञ एक उपाय सांगतात तो म्हणजे कला जोपासणं. अनेकाना छंदं जोपासणं किंवा कलेची आवड ही मोठ्या प्रमाणात असते. त्य़ातल्या ही मानसिक नैराश्यातून बाहेर पड़ायला मदत करते ते म्हणजे संगीत.
खरंतर संगीत असो किंवा कोणतीही कला माणसाच्या मनातली साचलेल्या भावनांचा निचरा होण्यासाठी संगीत मदत करतं. असं म्हणतात की जेव्हा व्यक्त होण्यासाठी शब्द सुचत नाही तेव्हा संगीत कामी येतं. चार वाद्य आणि त्यातून काही तरी आलेला आवाज म्हणजे संगीत नव्हे. मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी अनेकजण म्युझिक थेरपी घेतात. त्यामुळे संगीत हे आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे, हीच बाब लक्षात घेत 21 जून रोजी जागतिक पातळीवर जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही तर अनेक संगीतप्रेमींसाठी मोठी उत्सव आहे.
जागतिक दिन या शब्दाची देखील एक वेगळी गोष्ट आहे. जागतिक संगीत दिनाला , ज्याला ‘फेटे डी ला म्यूजिक’ (Fête de la Musique) असंही म्हटलं जातं. हा दिवस संगीताचा सन्मान करण्याचा दिवस देखील म्हणतात. संगीताचं वैशिष्ट्यं म्हणजे जे कधीच तुम्हाला शब्दात, समाजात बांधून न ठेवता फक्त आणि फक्त निखळ आनंद देतं.
संगीत दिन साजरा करण्याचा प्रवास हा फार जुना आहे. याची सुरुवात झाली ती फ्रान्समध्ये१९८२ मध्ये देशाचे संस्कृती मंत्री जॅक लँग आणि संगीत दिग्दर्शक मॉरिस फ्ल्युरेट यांनी एकत्रितपणे असा दिवस ठरवला जेव्हा प्रत्येकजण मुक्तपणे संगीतात मंत्रमुग्ध होतील. बहुतेकवेळा अनेक उत्तमोत्तम कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळत नाही. त्यांच्या अंगी असंख्य़ कलागुण असूनही त्या कलेला वाव मिळत नाही. ही गोष्ट लक्षात घेत २१ जून रोजी पहिला जागतिक संगीत दिन साजरा करण्यात आला. ही तारीख निवडण्यात आली कारण फ्रान्समध्ये हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या निमित्ताने संगीतप्रेमी पुन्हा नव्याने संगीताशी जोडले जातील. हा विचार हळूहळू जगभर पसरला. कालांतराने हा सांगितिक दिवस फ्रान्सपुरता मर्यादित न राहता जगभर साजरा होऊ लागला. आज, दरवर्षी १२० हून अधिक देश स्वत:च्य़ा देशाचं अस्सल संगीत जगासमोर आणण्यासाठी धडपडतात.
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अनुभव देतं.
कधीही कोणाही समोर जे व्यक्त करता येत नाही त्या भावना संगीतातून व्यक्त होतात.
ज्याला शब्दांची गरज नाही अशा भावना व्यक्त करण्याचं कसब हे संगीतात असतं म्हणूनच ही कला फक्त कला नव्हे तर समृद्ध आयुष्य जगण्याती गुरुकिल्ली देखील आहे.