जागतिक वन्यजीव दिन 2025 : वन्य वनस्पती आणि प्राण्यांच्या विविध प्रजातींच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी ३ मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली – संपूर्ण जगभरातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी दरवर्षी ३ मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. याचा उद्देश लुप्तप्राय प्रजातींविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे हा आहे. परंतु, वाढते जंगलतोड, हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे अनेक दुर्मिळ प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
जागतिक वन्यजीव दिनाची सुरुवात आणि उद्दिष्टे
संयुक्त राष्ट्र महासभेने २०१३ मध्ये आपल्या ६८ व्या अधिवेशनात ठराव पारित करून ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. यामागील मुख्य उद्देश म्हणजे लुप्त होत असलेल्या वन्यजीव आणि वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे. दरवर्षी या दिनासाठी एक विशिष्ट थीम निश्चित केली जाते आणि त्याअंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात.
नामशेष होणारे प्राणी – कुठे गेले हे जीव?
आज अनेक प्राणी आणि पक्षी जगातून नामशेष झाले आहेत, तर काही अत्यंत संकटग्रस्त स्थितीत आहेत. त्यापैकी काही महत्त्वाचे प्राणी पुढीलप्रमाणे
१. उत्तरी पांढरा गेंडा
उत्तर पांढऱ्या गेंड्यांची प्रजाती आता नामशेष मानली जात आहे. २०१८ मध्ये शेवटचा नर मरण पावला, आणि आता दोनच मादी गेंडे उरले आहेत, जे पुनरुत्पादनास सक्षम नाहीत. या प्रजातीच्या लोपास मुख्यतः त्यांच्या शिकारीला जबाबदार धरले जाते.
२. पॅसेंजर कबूतर
पूर्वी प्रचंड संख्येने असलेला हा पक्षी आता पूर्णतः नामशेष झाला आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या शिकारीमुळे आणि जंगलतोडीमुळे या पक्ष्याचा नाश झाला.
३. डोडो
मॉरिशस येथे आढळणारा हा न उडू शकणारा पक्षी १६६० मध्ये शेवटचा दिसला. नाविकांनी मोठ्या प्रमाणात त्याची शिकार केली, तसेच इतर प्राण्यांनी त्याची अंडी खाल्ल्यामुळे ही प्रजाती नामशेष झाली.
४. डच बटरफ्लाय (अल्कॉन ब्लू)
ही दुर्मिळ फुलपाखरांची प्रजाती मुख्यतः नेदरलँड्सच्यागवताळ भागात आढळायची. शेतीच्या विस्तारामुळे आणि अतिरेकी शहरीकरणामुळे १९७९ मध्ये ते शेवटचे पाहण्यात आले.
५. गोल्डन टॉड
या आकर्षक पिवळ्या रंगाच्या बेडूक प्रजातीला १९८९ मध्ये शेवटचे पाहण्यात आले, आणि १९९४ मध्ये त्याच्या नामशेषतेची घोषणा झाली. ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण आणि त्वचेच्या संसर्गामुळे या प्रजातीचा नाश झाला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : America Ukraine Tension : झेलेन्स्कींचा ‘प्लॅन बी’ तयार, ट्रम्प मदतीला न आल्यास युक्रेनला इतर पर्याय उपलब्ध
हरवलेल्या वनस्पती – निसर्गाचा अदृश्य ठेवा!
प्राण्यांप्रमाणेच काही वनस्पतीही नामशेष झाल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या प्रजाती पुढीलप्रमाणे,
१. Hopia Shinkeng
ही वनस्पती पूर्वी हिमालयात मोठ्या प्रमाणात आढळायची, पण गेल्या १०० वर्षांपासून तिचा कोणताही मागमूस नाही.
भारतामध्ये आढळणारे हे सदाहरित झाड आता IUCN (इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर) नुसार पूर्णतः नामशेष झाले आहे. जंगलतोड आणि हवामान बदल हे याला जबाबदार मानले जातात.
कर्नाटकमध्ये आढळणारी ही वनस्पती आता नामशेष झाली आहे. १९९८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या IUCN अहवालानुसार ही प्रजाती अस्तित्वात नाही.
मेघालयातील खासी डोंगराळ भागात आढळणारी ही वनस्पती झपाट्याने नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. IUCN ने तिला धोकाग्रस्त वनस्पतींच्या यादीत समाविष्ट केले आहे.
वन्यजीवांचे संरक्षण का महत्त्वाचे आहे?
वन्यजीव आणि वनस्पती ही पृथ्वीवरील परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. ते नष्ट झाल्यास जैवविविधतेचे संतुलन बिघडते आणि निसर्गचक्र बाधित होते. वाढते प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेप यामुळे वनस्पती आणि प्राणी मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहेत.
जागतिक वन्यजीव दिन 2025 : हरवत चालले निसर्गरम्य जग! ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक!
वन्यजीव आणि वनस्पतींचे संवर्धन ही केवळ सरकारांची जबाबदारी नाही, तर ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पुढील काही उपाय अवलंबून आपण निसर्गसंवर्धनात मदत करू शकतो
जंगलतोड थांबवणे आणि अधिक वृक्षारोपण करणे.
प्राण्यांच्या शिकारीविरोधात कठोर नियम लागू करणे.
प्रदूषण आणि हवामान बदल नियंत्रणात आणणे.
जैवविविधतेच्या संवर्धनासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आंतरराष्ट्रीय राजकारणात नवे समीकरण; डोनाल्ड ट्रम्प सोबत वादानंतर झेलेन्स्की ब्रिटनमध्ये बनले ‘हिरो’
निसर्ग वाचवा, पृथ्वी वाचवा!
यंदाच्या जागतिक वन्यजीव दिनी, आपण सर्वांनी मिळून हरवलेल्या आणि धोक्यात असलेल्या प्राणी व वनस्पतींचे संरक्षण करण्याचा निर्धार करूया. जर आपण आत्ताच योग्य पावले उचलली नाहीत, तर भविष्यात जैवविविधतेच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल!