IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा हंगाम 26 मे रोजी संपणार आहे. हा हंगाम अनेक दिग्गज खेळाडूंसाठी शेवटचा ठरू शकतो. या हंगामात असे काही खेळाडू आहेत जे शेवटच्या वेळी आयपीएल खेळताना दिसत आहेत. आयपीएल 2024 नंतर निवृत्त होणाऱ्या 5 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
दिनेश कार्तिकचा हा शेवटचा आयपीएल
38 वर्षीय अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचा हा शेवटचा आयपीएल हंगाम देखील असू शकतो. क्रिकेट खेळण्यासोबतच कार्तिक पार्ट टाइम समालोचकही आहे. निवृत्तीनंतर तो पूर्णवेळ समालोचक होण्याची शक्यता आहे. कार्तिकने आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 253 सामन्यांमध्ये 4799 धावा केल्या आहेत.
उमेश यादव कदाचित हा शेवटचा आयपीएल खेळणार
36 वर्षीय उमेश यादव 2010 पासून आयपीएल खेळत आहे. कदाचित त्याची ही शेवटची आयपीएल असेल. आता त्याला भारतीय संघातही स्थान नाही. अशा परिस्थितीत यादव स्वतः निवृत्ती घेऊन युवा खेळाडूंना संधी देऊ शकतो. आयपीएलमध्ये त्याने एकूण 147 सामन्यात 143 विकेट घेतल्या आहेत.
इशांत शर्माचा सुद्धा हा शेवटचा हंगाम असण्याची शक्यता
IPL 2024 हा अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मासाठी शेवटचा हंगाम असू शकतो, ज्याने भारतासाठी 100 हून अधिक कसोटी खेळल्या आहेत. वाढते वय आता त्याच्या शरीराला साथ देत नाहीये. या मोसमातही तो खूपच कमी खेळला आहे. इशांतने आयपीएलमध्ये खेळलेल्या 107 सामन्यांमध्ये 88 विकेट घेतल्या आहेत.
39 वर्षांचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा देखील IPL 2024 नंतर निवृत्त होऊ शकतो. तो 2008 पासून आयपीएल खेळत आहे. त्याने आयपीएलमध्ये 170 सामन्यांमध्ये 2934 धावा केल्या आहेत.
चेन्नईचा थाला आणि यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा शेवटचा आयपीएल
चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीचाही हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. गेल्या वर्षीच आयपीएलनंतर माही निवृत्त होऊ शकला असता. पण त्याच्या चाहत्यांसाठी त्याला आणखी एक वर्ष खेळणे योग्य वाटले. माहीला अजूनही गुडघ्यात समस्या आहे. असे असूनही तो त्याच्या चाहत्यांसाठी पूर्ण उत्साहाने मैदानात उतरतो. असे होऊ शकते की चाहते त्याला शेवटच्या वेळी पिवळ्या जर्सीत पाहत असतील. धोनीने आयपीएलमध्ये खेळलेल्या 261 सामन्यांमध्ये 5192 धावा केल्या आहेत.
Web Title: 5 players who can retire after ipl 2024 fans will also get moist after seeing their names in the list nryb