सोनम वांगचुक यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका! (Photo Credit- X)
सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की मानवी शरीराची वैद्यकीय स्थिती स्थिर राहत नाही. अशा गंभीर प्रकरणांमध्ये, न्यायालयाने सध्याची परिस्थिती आणि व्यापक जनहित यांचा विचार करणे आवश्यक असते. वांगचुक यांची प्रकृती खालावल्यावर सरकारने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी तत्परतेने पावले उचलली, हे योग्य पाऊल असल्याचे न्यायालयाने मान्य केले.
#UPDATE | Justice Mini Pushkarna is hearing the petition filed by Dr Gitanjali J. Angmo seeking Sonam Wangchuk’s discharge from Safdarjung Hospital and his transfer to a private hospital of the family’s choice. Senior Advocate Kapil Sibal appears for the petitioner, while ASG… https://t.co/hNqdrQpO29 — ANI (@ANI) July 19, 2026
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवरून नवा वाद; पत्नीने थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले
यापूर्वी, याचिकाकर्त्या डॉ. गीतांजली जे. अंगमो यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी असा युक्तिवाद केला होता की, सफदरजंग रुग्णालयात वांगचुक यांना त्यांचे वैयक्तिक डॉक्टर आणि वकील यांना भेटण्यापासून रोखले जात आहे. मेदान्ता रुग्णालय त्यांना दाखल करण्यास तयार असून त्यासाठी रुग्णवाहिका पाठवू शकते, असे नमूद करत सिबल यांनी त्यांना हलवण्याची परवानगी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
दरम्यान, केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) चेतन शर्मा यांनी न्यायालयाला आश्वासन दिले की, सफदरजंग आणि एम्स (AIIMS) मधील वरिष्ठ डॉक्टरांची टीम वांगचुक यांच्या प्रकृतीवर चोवीस तास लक्ष ठेवून आहे. सरकारचा युक्तिवाद स्वीकारत न्यायालयाने स्पष्ट केले की, सोनम वांगचुक हे पोलीस किंवा सरकारी कोठडीत नाहीत आणि त्यांच्या कुटुंबीयांना रुग्णालयात त्यांना भेटण्याची पूर्ण परवानगी आहे.
उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की, सोनम वांगचुक यांच्या उपचारांबाबतचे पुढील सर्व निर्णय डॉक्टरांनी त्यांच्याशी चर्चा करूनच घ्यावेत. याव्यतिरिक्त, न्यायालयाने केंद्र सरकार, दिल्ली पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाला या संपूर्ण प्रकरणावर तीन दिवसांच्या आत सविस्तर स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
Sonam Wangchuk : 20 जुलैला काय होणार? रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचे पहिले आवाहन






