फोटो सौजन्य - bdcrictime.com सोशल मीडिया
Nasir Hussain returns to the cricket field : सध्या भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा १८ व्या सीझनचे सामने सुरु आहे. देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटचा उत्सव सुरु झाला आहे. याचदरम्यान आता बांगलादेश क्रिकेट संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू नासिर हुसेन दोन वर्षांच्या बंदीनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतला आहे, त्यानंतर तो ढाका प्रीमियर डिव्हिजन लीग सामन्यात रूपगंज टायगर्स क्रिकेट क्लबकडून खेळताना दिसणार आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल ३३ वर्षीय हुसेनवर सप्टेंबर २०२३ पर्यंत सहा महिन्यांच्या निलंबनासह बंदी घालण्यात आली.
२०११ ते २०१८ दरम्यान हुसेनने सर्व फॉरमॅटमध्ये ११५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, ७ एप्रिल २०२५ पासून त्याच्यासाठी अधिकृत क्रिकेट खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बोर्डाने त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘बंदीच्या अटींनुसार, नासिर हुसेनने आता भ्रष्टाचारविरोधी शिक्षण सत्रे पूर्ण करण्यासह सर्व आवश्यकता पूर्ण केल्या आहेत.’ सप्टेंबर २०२३ मध्ये हुसेनवर बंदी घालण्यात आली.
🚨 **Cricket Comeback Alert! 🏆** 🚨
Bangladesh’s dynamic allrounder Nasir Hossain is back in action after a two-year hiatus due to an ICC ban! 🕺💥 He made a thrilling return, showcasing his skills for Rupganj Tigers against Gazi Group Cricketers. 🎉
Nasir has completed the… pic.twitter.com/bEoyQwznnX
— Cricap (@Cricap2024) April 7, 2025
आयसीसीच्या म्हणण्यानुसार, हुसेनवर सप्टेंबर २०२३ पर्यंत दोन वर्षांसाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती, त्यातील सहा महिने निलंबित करण्यात आले होते. २०२०-२१ अबू धाबी टी१० लीग दरम्यान त्याने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उल्लंघन केल्याचे तीन आरोप स्वीकारले होते.
हुसेनने तिन्ही फॉरमॅटमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले. २०११ ते २०१८ दरम्यान हुसेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले. या काळात या स्टार अष्टपैलू खेळाडूने १९ कसोटी, ६५ एकदिवसीय आणि ३१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये ६,००० हून अधिक धावा केल्या आहेत. हुसेनच्या नावावर दोन्ही फॉरमॅटमध्ये १७ शतके आहेत. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर त्याचे स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन हे त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.