फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
IPL 2025 : आयपीएल २०२५ चा आठवा सामना आज खेळवला जाणार आहे, या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. पहिल्या दिनी भव्यदिव्य आयपीएलचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये दिशा पाटनी, श्रेया घोषाल आणि करणं औजला यांनी मेहफिल लुटली होती. आयपीएल २०२५ चा उत्साह अजूनही कायम आहे. खेळाडूंव्यतिरिक्त, बॉलिवूड अभिनेत्री देखील या हंगामात त्यांच्या कामगिरीने चाहत्यांची मने जिंकत आहेत. आयपीएलला १८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, बोर्डाने सर्व ठिकाणी उद्घाटन समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. केकेआर आणि आरसीबी यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आणि गायिका श्रेया घोषाल यांनी सादरीकरण केले.
आता ३० मार्च रोजी सारा अली खान तिच्या सादरीकरणाने सर्वांचे मन जिंकणार आहे, ज्याची घोषणा करण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना ३० मार्च रोजी खेळला जाणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बरसपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे, जे राजस्थानचे होम ग्राउंड देखील आहे. या सामन्यात सारा अली खान परफॉर्म करणार आहे. आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून याची घोषणा करण्यात आली आहे.
Cricket meets glamour in Guwahati ✨
Sara Ali Khan is all set to set the stage on fire as #TATAIPL celebrates 18 iconic years! 🔥
Get ready for a night of music, dance & pure adrenaline! 🎶#RRvCSK pic.twitter.com/2KPtLcCodP
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2025
पहिल्या सामन्यात बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानने परफॉर्म केले. त्याच्यासोबत विराट कोहली आणि रिंकू सिंग यांनीही नृत्य केले. सारा अली खानबद्दल बोलायचे झाले तर तिने केदारनाथ, सिम्बा, लव्ह आज कल २ आणि स्काय फोर्स सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
आयपीएल २०२५ मध्ये, सीएसकेने आपला पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळला. या सामन्यात सीएसकेने शानदार कामगिरी केली आणि जिंकले आणि २ गुण मिळवले. सीएसके २८ मार्च रोजी आरसीबीविरुद्ध आपला दुसरा सामना खेळेल. राजस्थान रॉयल्सबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत खेळलेल्या २ सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थानला पहिला सामना हैदराबादकडून हार पत्करावी लागली. तर दुसऱ्या सामन्यात केकेआरने राजस्थानला हरवले. आता राजस्थानची अंतिम परीक्षा ३० मार्च रोजी होणार आहे.