रवीचंद्रन अश्विन(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : रवीचंद्रन अश्विन हा आपल्या स्पष्ट बोलण्याने ओळखला जातो. तो जितका मैदानात आपल्या गोलंदाजीने फलंदाजांची भंबेरी उडवतो त्याच पद्धतीने तो मैदानाबाहेर देखील सर्वांची बोलती बंद करतो. अशातच त्याने टी २० फॉरमॅटमध्ये गोलंदाजांना येणाऱ्या अडचणींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्या फलंदाजांना खूप फायदा होत असल्याचं अश्विनने म्हटले आहे. त्यामुळे सामन्यात ओव्हर टाकत असताना कमी धावा दिल्या जाव्यात, या विचारात गोलंदाज नेहमी असतात. त्यामुळे त्यांना मानसिक आरोग्याच्या मदतीची आवश्यकता असू शकते. असे मत अश्विनने व्यक्त केले आहे. सध्या आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम सुरू असून आतापर्यंत ७ सामने खेळवण्यात आले आहेत. १८ व्या हंगामात अश्विन चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळत आहे.
हेही वाचा : IPL 2025 : आयपीएल म्हणजे सर्व काही शक्य..! केवळ ५ सामन्यांत चौकार, षटकार अन् २०० प्लसचे मोडले रेकॉर्ड…
अश्विनने एका युट्यूब चॅनल दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आयपीएलमधील काही खेळपट्टयांवर गोलंदाजांना यश मिळवणे फार कठीण होत आहे. सध्या आयपीएलमध्ये पारंपारिक गोलंदाजीपेक्षा फुल टॉस टाकणे ही एक चांगली पद्धत असू शकते, असंही अश्विन गमतीने म्हणाला. आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात झालेले सामन्यात अनेक संघांनी धावांचा डोंगर उभा केलाय, जवळपास अनेक सामन्यात २०० धावांचा टप्पा पार करण्यात अनेक संघ यशस्वी ठरले आहेत.
हेही वाचा : CSK vs RCB : आरसीबी 17 वर्षांपासून चेपॉकवर विजयापासून वंचित; आजच्या सामन्यात दुष्काळ संपेल? वाचा सविस्तर..
कमी धावसंख्येच्या सामन्यांमध्येही एका संघाने लक्ष्याचा सहज पाठलाग केला. इतर अनेक सामन्यांमध्ये संघांनी २०० पेक्षा जास्त धावा केल्या. २०२४ च्या आयपीएल हंगामात ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम लागू झाल्यानंतर, संघांना एक फलंदाज किंवा गोलंदाज बदलण्याची परवानगी होती. त्यानंतर सामन्याची सरासरी १८९ धावांची झाली. अश्विन म्हणाला की, गोलंदाजांना लवकरच वैयक्तिक मानसोपचार तज्ज्ञांची गरज भासेल. काही खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करणे अशक्य झाले आहे. अनुभवी फिरकीपटू आर अश्विनला चेन्नई सुपर किंग्जने ९१७५ कोटी रुपये खर्च करत परत एकदा आपल्या संघात सामील केले आहे.
इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम सध्या सुरुवातीच्या टप्प्यात असून आतापर्यंत आयपीएल 2025 मधील 7 सामने झाले आहेत. तर आज 8 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा रोमांचक सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे रंगणार आहे. दोन्ही संघांनी 18 व्या हंगामातील आपला पहिला सामना जिंकला असून आरसीबीने पहिल्या सामन्यात केकेआरचा 7 गडी राखून पराभव केला आहे तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई इंडियन्सला धूळ चारली आहे.