नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनची (All India Football Federation) निवडणूक आज २ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीत माजी कर्णधार बायचुंग भुतिया (Baychung Bhutiya) विरुद्ध माजी गोलरक्षक कल्याण चौबे (Kalyan Chaube) या दोघांमध्ये अध्यक्षपदासाठी मोठी चढाओढ असणार असून या दोघात नक्की कोण बाजी मारणार हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे.
शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीत तब्बल ८५ वर्षांपासूनचा इतिहास असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला यंदा प्रथमच माजी खेळाडू असलेला अध्यक्ष मिळू शकतो. माजी कर्णधार बायचुंग भुतिया विरुद्ध माजी गोलरक्षक कल्याण चौबे यांच्यात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
भारतीय फुटबॉलचा दिग्गज खेळाडू बायचुंग निवडणुकीच्या रिंगणात उतरला नसता तर हा सामना एवढा चर्चेत आला नसता. ४५ वर्षीय चौबे यांनी विजयाची अधिक संधी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना राजकीयदृष्ट्या ताकदवान असलेल्या गुजरात आणि अरुणाचल प्रदेश यांचा पाठिंबा आहे.
चौबे हे पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ईशान्य भारतातील प्रबळ असलेल्या राजकीय व्यक्तीचा त्यांना पाठिंबा आहे, ही व्यक्ती भारतीय क्रीडा क्षेत्राशी निगडित आहे. या तुलनेत भुतिया यांनी ज्या सिक्कीम राज्याचे प्रतिनिधित्व केले तेथूनही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा मिळालेला नाही.
मागील अनेक काळापासून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची निवडणूक न झळयामुळे फिफाने भारतीय संघ फुटबॉल खेळण्यावर बंदी आणली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे गेल्यावर फिफाने कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेऊन भारतावरील बंदी उठवली आहे. याच पाश्ववभूमीवर एआयएफएफ च्य अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.