भारत-पाकिस्तान क्रिकेट टिम(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : २०२५ या वर्षात आशिया कपचा थरार पाहायला मिळणार आहे. सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धेचे आयोजन भारत करणार आहे. या स्पर्धेला अजून तीन महिने शिल्लक आहेत. परंतु, या अद्याप या स्पर्धेबद्दल फारसे काही निर्णय घेण्यात आलेले नाहीत. त्याआधी आशियाई संघ खूप व्यस्त असल्याचे दिसत आहे. त्याच वेळी, अधिकृत प्रसारक सोनीकडून एक पोस्टर जारी करण्यात आले आहे. ज्यामध्ये भारत, बांगलादेश आणि श्रीलंका संघांचे कर्णधार दाखवण्यात आले आहेत.
सोनीने जारी केलेल्या या पोस्टरमध्ये पाकिस्तान संघाच्या कर्णधाराचा फोटो दिसत नाही. त्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच गदारोळ उठला आहे की, या पोस्टरमध्ये त्यांचा कर्णधार का दाखवण्यत आला नाही? मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याबाबत भारत सरकारशी बोलण्याची शक्यता आहे. जर बोर्डाला भारत सरकारकडून परवानगी देण्यात आली तरच ते पाकिस्तानसोबत सामने कधी आणि कुठे खेळवायचे याबाबत ठरवण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : AUS vs WI : कांगारुचं मोडलं कंबरडं! 2 दिवसात 24 विकेट, दोन्ही संघाच्या गोलंदाजांचा सामन्यात कहर
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या उपस्थितीबद्दल सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना अद्याप याची काही एक माहिती नाही. महिला क्रिकेट पुरुष क्रिकेटपेक्षा वेगळे आहे, कारण भारत-पाकिस्तान सामन्याकडे फारसे लक्ष देण्यात येत नाही. दुसरीकडे, पुरुष क्रिकेट वेगळे आहे, ते कोट्यवधी लोक पाहत असतात.
यानंतर, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, ऑपरेशन सिंदूर नंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल शंका निर्मर झाली आहे. बीसीसीआय या विषयावर भारत सरकारशी बोलणार आहे. त्यांच्या सूचनांनंतरच पुढील जो काही निर्णय असेल तो घेण्यात येईल.
हेही वाचा : MLC 2025 : IPL मध्ये डामाडोल तर मेजर लिगमध्ये केला धमाका! आंद्रे फ्लेचरचे शतक व्यर्थ, नाईट रायडर्सचा पराभव
पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनेकडून २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगामवर हल्ला करण्यात आला होता. या दरम्यान भारतातील २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, पाकिस्तानचे ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधात दरी निर्माण झाली होती. त्याचा परिणाम खेळावरही झालेला दिसून येत आहे.